Farmers are worried as there is still no satisfactory rainfall in Beed
आष्टी, पुढारी वृत्तसेवा : मे महिन्यात अवकाळी पाउस झाला. त्यानंतर जून महिन्यात रिपरिप पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, जून महिना सरला तरी मोठा पाउस न झाल्याने शेतकऱ्यांची डोळे आभाळाकडे लागली आहेत. परिणामी, हातउसने घेवून केलेली लागवड वाया जात असल्याने आष्टीसह परिसरातील शेतकऱ्यांपुढे मोठे संकट ओढावले आहे.
परतूर तालुक्यातील आष्टी व परिसरात सर्व दारोमदार ही शेतीवरचं अवलंबून आहे. बाजारपेठ ही शेती वरच अवलंबून आहे. वर्षो न वर्ष शेतीमध्ये हवे तसे उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी दरवर्षी कर्जाच्या खाईत बुडत चालला आहे. निसर्गाच्या लहरीपणा मुळे शेतकऱ्यांपुढे एक ना एक संकट उभे आहे.
चालू वर्षी ही आख्खा जून महिना संपला तरी पाऊस पडला नाही व हवामान तज्ञ शोसल मिडिया वर तर पावसाळा सुरू होण्यापूर्वी दरवर्षी पेक्षा यावर्षी मोठ्या प्रमाणात पावूस होणार असे तोंड फाटूस्तर बडबड करतात आता तेही गायब झाले आहे. मे महिन्यात चांगल्य प्रमाणात पावूस झाल्यामुळे व हवामान तज्ञ च्या ईशायनि शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आदी पिकांची पेरणी केली.
जमीनीत ओल होती. त्यामुळे बी उगले, पण आता जून महिना कोरडा गेल्याने पेरलेली पिकें अता माना टाकत आहे. शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे मोठे संकट उभे राहिले आहे त्यात बी बियाणे, खत, फवारणी औषधीचे व मंजुरी चे भाव गगनाला भिडले आहे. सातबारा कोरा करून पुर्णपणे कर्ज माफी करू अशी आश्वासने दिली होती. पण आता पर्यंत दिली नाही व बँकेवाले कर्जासाठी शेतकऱ्यांला उभे राह देत नाही शेतकऱ्यांनी जगायचे कसे असा प्रश्न पडला आहे. शेतकऱ्यांची अर्थीक प्ररस्थिती फारचं बिकट झाली आहे त्यामुळे त्यांचा बाजारपेठेवर ही फार मोठा परिणाम झाला आहे.
निसर्गाच्या लहरीपणा मुळे दुबार पेरणीचे मोठे संकट उभे राहिले आहे. जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपला पण अजूनही पाऊस झाला नाही शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले असून हलक्या शेतातील पिकांची वाढ खुंटली आहे.