गेवराई : दहा हजार रूपयांच्या खऱ्या नोटा देऊन वीस हजार रूपयांच्या पाचशे रूपयांच्या बनावट नोटा स्वीकारल्या जात होत्या. त्याच नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांविरुध्द बीडमधील गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बालाप्रसाद बाहेती रा.गेवराई (लाड गल्ली)नासेर शेख रा.बोधेगाव जि.अहिल्यानगर अशी आरोपीची नावे आहेत.
बालाप्रसाद बाहेती याने चलनातील दहा रुपयांच्या ख-या नोटा देत नासेर शेख याच्याकडून विस हजार रुपयांच्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा घेतल्या. त्या नोटा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चलनात वापरत असल्याचा प्रकार काल उधुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई बायपास रस्त्यावर असलेल्या एका पेट्रोल पंपावर उघडकीस आला. पोलीस हवालदार राजु भिसे यांच्या तक्रारीवरून आरोपी बालाप्रसाद बाहेती व नासेर शेख याच्याविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एपीआय दिपक लंके हे करित आहेत.