Entry ban on 61 people in Beed and Gevrai cities
बीड, पुढारी वृत्तसेवा : नगरपरिषद निवडणूकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस दल अलर्ट मोडवर असून बीड व गेवराई शहरातील तब्बल ६१ जणांना शहरात प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. याबाबतचे आदेश पारित करण्यात आले.
बीड व गेवराई शहरात असलेल्या बीड शहर, शिवाजीनगर, पेठबीड व गेवराई या पोलिस ठाण्यांकडून हद्दीमध्ये रेकॉर्डवरील, बेकायदेशीर कृत्य करणारे व गुन्हेगारी प्रवृत्तीचे तसेच निवडणूक अनुषंगाने दाखल असलेल्या गुन्ह्यातील व्यक्तींवरोिधात प्रभारी अधिकाऱ्यांनी नावे कळवली होती. यामधील ६१ जणांना गेवराई व बीड शहरात निवडणूक काळात प्रवेश बंद करण्यात आलेली आहे.
यामध्ये बीड शहर पोलिस ठाणे हद्दीतील २०, शिवाजीनगर पोलिस ठाणे हद्दीतील १०, पेठबीड पोलिस स्टेशन हद्दीतील १७तसेच गेवराई पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १४ व्यक्तींविरोधात कारवाई करण्यात आलेली आहे. सदर व्यक्तींना तालुक्यात प्रवेश करण्याच्या सूचना दिल्या असून यांनी या कालावधीत प्रवेश केल्यास स्थानिक पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.
बीड शहर ठाणे हद्दीतील जयदीप ऊर्फ कृष्णा मुळे, शिवलाल नंदलाल गुरखुदे, आकाश राजेंद्र खांबे, करण चांगुजी लोंढ, अन्सारी जिकवाउद्दीन मिन्हाजुद्दीन, प्रदिप जयसिंग टाक, सुमित सुनिल तुसांबड, सागर संपतराव झेंडे, अशोक नामदेव गायकवाड, खमर मुस्ताक फारोकी, उमर फारोकी मुस्ताक फारोकी, अमनखान नासेरखान पठाण, सफीक खादर शेख, मुजम्मील जावेद शेख, तसवर शेख वाहेद शेख, सफवानखान महेबुबखान पठाण, संतोष ऊर्फ भैय्या कोंडीराम भोसल, शेख मुसद्दीक जिलानी, समीर आबुसलाम काझी, कृष्णा हरिश्चंद्र गुंजाळ यांना तर शिव-नाजीनगर पोलिस ठाणे हद्दीतील अमोल कल्याण पवार, अमोल संजय बारस्कर, अविनाश बाबुराव उबाळे, गणेश गोरख शिराळे, संतोष रघुनाथ मिटकर, भागवत मानिकराव वाघ, शेख लाला ऊर्फ इरफान समद, सुभाष अर्जुन गायकवाड, पोपट बाबासाहेब काळे, गणेश भारत गिरी यांना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे.