

A truck loaded with soybeans overturned near Salegaon.
केज, पुढारी वृत्तसेवा: केज-कळंब रोडवर साळेगाव येथील पुलावर क्षमतेपेक्षा जास्त सोयाबीन भरलेला ट्रक हा पुलावरच्या जम्पिंगमुळे टायर फुटून पलटी झाला आहे. त्यामुळे ऐन लग्नाच्या मुहूर्ताच्या वेळी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या असून वाहतूक खोळंबली आहे.
केज कळंब रोडवर साळेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ असलेल्या पुलावर दि. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता अंबाजोगाई येथून धारावशीवकडे क्षमते पेक्षा जास्त सोयाबीन भरून घेऊन जात असलेला ट्रक हा पुलावरील जम्पिंगमुळे ट्रकचे टायर फुटून तुटूली आणि त्यामुळे ट्रकचे हाऊजिंग तुटून ऐन पुलात ट्रक पलटी झाला.
अपघातामुळे आणि ऐन पुलाच्या मध्यभागी ट्रक पलटी झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक खोळंबली होती. मात्र कोणी जखमी किंवा जीवित हानी झालेली नाही. ट्रक ड्रायव्हर संजय जाधव (रा. बोरीसावरगाव ता. केज) याला कीरकोळ जखमी झाला असून तो सुखरूप आहे. मात्र आज लग्राची तिथ असल्याने ऐन पुलाच्या मधोमध ट्रक पलटी झाल्याने दोन तासापेक्षा जास्त वेळ रस्त्यावरील वाहतूक दोन्ही बाजूला खोळंबलेली होती.
अपघाताची माहिती मिळताच केज
पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कादरी, पोलिस जमादार बाळासाहेब अहंकारे, पोलिस हेडकॉन्स्टेबल शिवाजी कागदे, पोलिस कॉन्स्टेबल संतोष गित्ते हे अपघातस्थळी पोहोचले. पोलिसांनी पोकलेनच्या मदतीने ट्रक रस्त्यावरून हटवून रस्ता खुला केला.
वाहनाची माल वाहतूक करण्याची क्षमता माहित असून सुद्धा त्यामध्ये असताना सुद्धा ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा माल भरून त्याची निष्काळजीपणे वाहतूक करून स्वतः सह इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्या प्रकरणी ट्रक चालकारवर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती मिळते आहे.