Fraud News : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात अडीच कोटींचा अपहार File Photo
बीड

Fraud News : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात अडीच कोटींचा अपहार

सायबर पोलिसांनी रक्कम वसूल करत ८१ लाख गोठवले

पुढारी वृत्तसेवा

Embezzlement of ₹2.5 Crores in the Chief Minister's Employment Generation Programme

बीड, पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत तब्बल २ कोटी ५१ लाख ५१ हजार ६९२ रुपयांच्या कर्जावरील अनुदान अपहारप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला होता. अत्यंत क्लिष्ट स्वरूपाच्या या सायबर गुन्ह्याचा तांत्रिक पद्धतीने तपास करत पोलिसांनी संबंधित आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक केली, आहे.

या प्रकरणी उद्योग सहसंचालक विभागीय कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत असलेले बाळासाहेब त्र्यंबक यशवंते (वय ५४) यांनी फिर्याद दिली होती. त्यावरून बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान आर-ोपींनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातील कर्ज प्रकरणांसाठी खोटे दस्तऐवज तयार करून बँकेच्या पोर्टल लॉगिनचा गैरवापर केल्याचे उघड झाले.

या माध्यमातून शासनाच्या अनुदान रकमेचा अपहार करण्यात आला होता. सायबर पोलिसांनी तपासादरम्यान अपहार झालेल्या रकमेपैकी आतापर्यंत ८१ लाख ७८ हजार २८९ रुपये गोठवण्यात तसेच आरोपींकडून काही रक्कम वसूल करण्यात यश मिळवले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक बीड आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश केळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आराके, पोलीस उपनिरीक्षक स्वाती लहाने, पोलीस हवालदार पंचम वडमारे, भारत जायभाये, विजय घोडके तसेच महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री काशिद यांच्या पथकाने नागरिकांनी केली.

दरम्यान, ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना आलेले फोन, एसएमएस किंवा लिंकची खात्री करूनच व्यवहार करावेत, अनोळखी एपीके फाईल्स अथवा लिंकवर क्लिक करू नये, ओटीपी कोणाशीही शेअर करू नये तसेच सोशल मीडिया खाती सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन सायबर पोलीस स्टेशन बीडकडून करण्यात आले आहे.

सायबर फसवणुकीसंदर्भात तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांनी तात्काळ १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल येथे ऑनलाईन तक्रार नोंदवावी, असेही पोलिसांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT