ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या या मुख्य कार्यालयावर ईडीने छापा टाकला.  file photo
बीड

Beed ED Raid | ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या मुख्य कार्यालयावर ईडीचा छापा

पुढारी वृत्तसेवा

बीड : बीडच्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या हजारो कोटीच्या घोटाळ्यातील आरोपी असलेल्या सुरेश कुटे आणि आशीष पाटोदेकर यांची विविध ठिकाणची साडेपाच हजार कोटीची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली आहे. आता सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या कार्यालयावर इडीने छापे टाकले आहेत.

संभाजीनगरमध्ये काल सकाळी छापे टाकल्यानंतर रात्री उशिरा बीड येथील मुख्य कार्यालयावरती देखील अधिकाऱ्यांनी सर्च मोहीम राबवत संगणक आणि मुख्य कागदपत्रांची तपासणी केली. तसेच बीडमधील मुख्य कार्यालय सील केले. राज्यात विविध ठिकाणी कुटेंवर ५२ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. सध्या तो तुरुंगात आहे. काल ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकताना ईडीचे ६ अधिकारी २ पंच, केंद्रीय राखीव दलाचे जवान उपस्थीत होते. ज्ञानराधा पतसंस्थेच्या कार्यालयात जाऊन कागदपत्रांची तपासणी केली, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT