अंतरवाली सराटी गावात रात्री ड्रोन फिरत असल्याचे दिसून आले  Pudhari File Photo
बीड

मनोज जरांगे यांच्या गावाची ड्रोन कॅमेऱ्याने रेकी

पुढारी वृत्तसेवा

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठवड्यात अंतरवाली सराटी गावात २६ जूनला मध्यरात्री ड्रोन कॅमेराने घिरट्या घालत गावची रेकी केली होती. त्यानंतर सोमवारी (दि.१) पुन्हा एकदा अज्ञात दोन ड्रोन गावात घिरट्या घालत असल्याचे दिसून आले. त्यानंतर गावातील नागरिकांनी गोंदी पोलिस ठाण्यात धाव घेत याची माहिती पोलिसांना दिली.

गेल्या आठवड्यात सरपंच कौशल्याबाई तारख यांच्या घराच्या परिसरात व गावात मध्यरात्री ड्रोन फिरले. त्यानंतर सोमवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान दोन ड्रोनच्या माध्यमातून पुन्हा गावात रेकी झाली. एक कॅमेरा सरपंच राहत असलेल्या परिसरात दिसून आला तर दुसरा ड्रोन कॅमेरा गावात फिरत असल्याचा पहायला मिळाला.

अंतरवाली सराटी हे गाव मराठा आंदोलनाचे केंद्र बनले आहे. ड्रोनच्या घिरट्या गत आठवड्यापासून सुरू असल्याने या आंदोलनामुळे हे ड्रोनच्या घिरट्या सुरू आहे का? असा संशय निर्माण झाला आहे. रात्रीच्या अंधारात उडवण्यात येणाऱ्या ड्रोनमुळं नागरिक धास्तावले आहेत. नागरिकांमध्ये ड्रोनच्या घिरट्यांनी भीतीचं वातावरण आहे. ड्रोनच्या माध्यमातून चोरीसाठी टेहाळणी तर केली जात नाही ना? असा संशय नागरिकांना आहे. पोलिसांनाही अद्याप याची माहिती लागत नसल्याने, ड्रोनचं गुढ कायम असून ड्रोन नक्की कोण उडवतयं? त्यामागचा उद्देश काय? याचा शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT