Dr. Sampada Munde Death Case : मुंडे कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी लढा उभारणार : उद्धव ठाकरे यांचे आश्वासन File Photo
बीड

Dr. Sampada Munde Death Case : मुंडे कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी लढा उभारणार : उद्धव ठाकरे यांचे आश्वासन

शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंकडून मुंडे कुटुंबीयांचे सांत्वन

पुढारी वृत्तसेवा

Will fight to get justice for Munde family: Uddhav Thackeray's assurance

वडवणी, पुढारी वृत्तसेवा : डॉ. संपदा मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी आता शिव-सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मृत डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने उभे राहण्याचा विश्वास दिला आहे.

वडवणी तालुक्यातील कवडगाव येथील मुंडे कुटुंबीयांची शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुरुवारी भेट घेतली. यावेळी गावातील काही आंदोलक पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत होते. आंदोलकांची भेट घेऊन लढाई लढण्यास आपण समर्थ आहोत खाली या अशी विनंती अंधारे यांनी यावेळी केली तसेच मुंडे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करण्यात आले आहे. यावेळी मुंडे कुटुंबियांकडून कैफियत ऐकून घेतली.

आपल्या फोनवरून थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मुंडे कुटुंबीयांचे बोलणं करून दिले. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही तुमच्या कुटुंबीयांसोबत आहोत. या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू आणि न्यायालयीन लढाईही लढू, असे ठाम आश्वासन उद्धव ठाकरे यांनी कुटुंबीयांना दिले. त्यांनी पुढे सांगितले की, सरकारने दोन नोव्हेंबरपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर ३ नोव्हेंबर रोजी सर्व शिवसैनिक फलटण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करतील. यासंदर्भात जिल्हाप्रमुखांना आवश्यक ती तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

डॉ. संपदा मुंडे या निष्पाप, कर्तबगार आणि कर्तृत्ववान मुलगी होती. तिच्यासोबत अन्याय झालेला आम्ही सहन करणार नाही. मुंडे कुटुंबीयांनी घाबरून न जाता ठामपणे उभे राहावे. उच्च न्यायालयातील तज्ञ वकीलांची मदत देण्याची जबाबदारी आम्ही घेतो. असा विश्वास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मृत डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांना फोनद्वारे विश्वास दिला आहे. डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणाने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

विविध राजकीय पक्षांकडून या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी आवाज उठवला जात असताना, उद्धव ठाकरे यांच्या या आश्वासनामुळे मुंडे कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. यावेळी तालुकाप्रमुख विनायक मुळे सह आदी शिवसैनिक उपस्थित होते.

पाण्याच्या टाकीवर चढून तरुणांनी केले आंदोलन

डॉ. संपदा मुंडे प्रकरणी न्याय मिळावा, या मागणीसाठी कवडगाव येथील तरुणांनी गुरुवारी अनोखा आंदोलनाचा मार्ग अवलंबला. गावातील पाणी पुरवठ्याच्या टाकीवर चढून तरुणांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केला. तरुणांनी स्वतंत्र एसआयटी स्थापन करावी, खटला बीड येथे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, तसेच संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशा ठोस मागण्या केल्या. या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्परता दाखवत मध्यस्थी करून तरुणांना शांत केले आणि सुरक्षितपणे टाकीवरून खाली उतरवले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

अंधारे अन् रूपाली पाटील ठोंबरेंमध्ये शाब्दिक चकमक

मुंडे कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेल्या सुषमा अंधारे आणि रुपाली पाटील ठोंबरे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या घटने दरम्यान, महिला आयोगाच्या भूमिकेवर, त्याच्या अधिकारांवर आणि फलटण प्रकरणातील प्रशासकीय जबाबदारीवर व उपमुख्यमंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना प्रकरणाची माहिती नसेल, तर त्यांनी पदावर राहू नये, अशी भूमिका मांडली सुषमा अंधारे यांनी मांडल्याने या विषायाने दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दीक चकमक झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT