Neelam Gorhe : न्याय मिळाल्याशिवाय आता मागे हटणार नाही File Photo
बीड

Neelam Gorhe : न्याय मिळाल्याशिवाय आता मागे हटणार नाही

डॉ. नीलम गो-हे यांची ग्वाही; डॉ. गौरी गर्जे-पालवे यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

पुढारी वृत्तसेवा

Dr. Neelam Goree met the family of Dr. Gauri Garje-Palve

बीड, पुढारी वृत्तसेवा: बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथे गुरुवारी (दि. २७) विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी स्व. डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या आई-वडिलांची भेट घेऊन त्यांच्या मनातील प्रश्न, वेदना आणि न्यायाबाबतच्या अपेक्षा जाणून घेतल्या. भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

डॉ. गोन्हे म्हणाल्या की, गौरी पालवे-गर्जे यांचा मुंबईतील मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. तिच्या कुटुंबाने काही महत्त्वाची अतिरिक्त माहिती पोलिसांना द्यायची इच्छा व्यक्त केली; परंतु त्यांची नोंद झाली नव्हती. या तक्रारीची मी तात्काळ दखल घेऊन मुंबई पोलिसांशी तसेच स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांशी बोलले असून, पुढील दोन-तीन दिवसांत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्या सर्व पुरवणी जबाबांची नोंद केली जाणार आहे.

कुटुंबीयांनी आरोपीचे भाऊ अजय गर्जे आणि बहीण शीतल आंधळे यांनाही अटक करावी, अशी मागणी केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गौरीवर पूर्वी अनेकदा मारहाण झाल्याचे त्यांनी सांगितल्याने या प्रकरणाचे मूळ कारण नीट समजून घेणे अत्यावश्यक असल्याचेही डॉ. गोन्हे यांनी नमूद केले.

उपसभापती म्हणून जबाबदारी आहेच, पण आई म्हणूनही हे प्रकरण मन हेलावून टाकणारे आहे. कुटुंबीयांना सक्षम सरकारी वकील मिळावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याशी मी स्वतः बोलणार आहे. तपासात कुठलाही दबाव सहन केला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

न्यायप्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी डॉ. गोन्हे यांनी मुंबई पोलिसांना दोन महत्त्वाचे निर्देश दिले. पहिला तपासाच्या प्रगतीबाबत अधिकृत बुलेटीन दर दोन दिवसांनी पत्रकारांना देण्यात यावी, जेणेकरून अफवा आणि अप्रमाणित माहितीला आळा बसेल. दुसरा अशा संवेदनशील खटल्यांमध्ये न्यायालयीन सुनावणीदरम्यान पीडितेवरच आरोप केले जातात; म्हणून संपूर्ण सुनावणीचे इन कॅमेरा व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी न्यायालयात विनंती करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

तसेच जवळील गावातील एका पॉक्सो प्रकरणातील तक्रार नोंदवण्यात उशीर झाल्याबाबतही त्यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांच्या तक्रारीची त्वरित आणि गांभीयनि नोंद होणे आवश्यक आहे. गावांमध्ये पॉक्सो कायद्याबाबत जागृती वाढवण्यासाठी ग्रामसभा घेणे आवश्यक आहे, असे डॉ. गोन्हे म्हणाल्या, पॉक्सो प्रकरणातील पीडित मुली आणि पालकांना तपासाच्या प्रगतीची नियमित माहिती देण्याबाबत भारतीय न्यायसंहितेतील नव्या तरतुदींची माहितीही त्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT