Beed News : चेष्टा-मस्करीतही आक्षेपार्ह मजकूर शेअर करू नका file photo
बीड

Beed News : चेष्टा-मस्करीतही आक्षेपार्ह मजकूर शेअर करू नका

पोलिस उपनिरीक्षक केळे यांचे विद्यार्थांना आवाहन

पुढारी वृत्तसेवा

Do not share objectionable content, even in jest

बीड, पुढारी वृत्तसेवा : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांचा वापर करताना विद्यार्थ्यांनी अत्यंत सतर्क व जबाबदार राहणे आवश्यक आहे. चेष्टा-मस्करीत अथवा गंमत म्हणूनही आक्षेपार्ह मजकूर, फोटो किंवा व्हिडिओ प्रसारित केल्यास थेट गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई होऊ शकते, असा स्पष्ट इशारा बीड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निलेश केळे यांनी दिला. आदित्य शिक्षण संस्था संचलित आदित्य कृषी महाविद्यालयाच्या 'एकदंत गणेशाची आरती त्यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

आदित्य शिक्षण संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालक डॉ. आदित्य सारडा आणि संचालिका डॉ. आदिती सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पसमध्ये एकदंत गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या उत्सवांतर्गत आयोजित विशेष आरती पोलीस उपनिरीक्षक निलेश केळे यांच्या हस्ते पार पडली.

आरतीनंतर त्यांनी उपस्थितांना ऑनलाइन फसवणूक, एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचे धोके आणि सायबर गुन्ह्यांपासून बचावाबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. ते म्हणाले सोशल मीडिया आणि एआय सारख्या आधुनिक प्लॅटफॉर्मचा वापर शैक्षणिक व प्रगतीकारक कामांसाठीच केला पाहिजे. सध्या डिजिटल विश्वात आर्थिक फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे.

विद्यार्थ्यांनी कोणत्याही अनोळखी लिंक, संशयास्पद मेसेज, फेक कॉल्स किंवा कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडू नये. वैयक्तिक माहिती आणि ओटीपी कोणासोबतही शेअर करू नये. डिजिटल जगात सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने 'सतर्कता, सुरक्षितता आणि जबाबदारी' या त्रिसूत्रीचा अवलंब करणे ही काळाची गरज बनली असल्याचे ते म्हणाले.

आदित्य कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य श्याम भुतडा यांच्या नियोजनाखाली गणेशोत्सवातील विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात सुरू आहेत. या महोत्सवाला संस्थेतील विविध शाखांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT