Ganja Distribution : गांजाच्या वाटणीवरून कैद्यांमध्ये वाद बीड कारागृहातील प्रकार, खोक्या भोसलेसह तिघांवर गुन्हा  File photo
बीड

Ganja Distribution : गांजाच्या वाटणीवरून कैद्यांमध्ये वाद बीड कारागृहातील प्रकार, खोक्या भोसलेसह तिघांवर गुन्हा

यावेळी बंदोबस्तावरील कर्मचाऱ्याला देखील बघून घेण्याची धमकी या कैद्यांनी दिली.

पुढारी वृत्तसेवा

Dispute among prisoners over distribution of ganja: Beed Jail incident

बीड, पुढारी वृत्तसेवा: कारागृहात आणलेला गांजा वाटून घेण्याच्या कारणावरुन बॅरेक नंबर चारमधील चार कैद्यांमध्ये वाद झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. यावेळी बंदोबस्तावरील कर्मचाऱ्याला देखील बघून घेण्याची धमकी या कैद्यांनी दिली. यामध्ये सतीश उर्फ खोक्या भोसले याच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सतीश उर्फ खोक्या भोसले, शाम पवार, वसीम पठाण व यमराज राठोड असे वाद केलेल्या कैद्यांची नावे आहेत. या चौघांनी बीड जिल्हा कारागृहात चोरट्या पद्धतीने गांजा आंणला होता. शनिवारी सकाळी त्या गांजाच्या वाटणीवरुन वाद झाला. कैद्यांमध्ये वाद झाल्याचे पाहून बंदोबस्तावरील कर्मचारी त्या ठिकाणी धावून गेला असता त्याला शिवीगाळ करत बाहेर सुटल्यावर बघून घेतो अशी धमकी या चौघांनी दिली. या प्रकरणात सुभेदार चिंचाणे यांच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड जिल्हा कारागृहातील ढिसाळ कारभार वारंवार समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच एका कैद्याकडे गांजा आढळून आला होता. त्यानंतर आता तर थेट कैद्यांमध्ये गांजाच्या कारणा-वरुन वाद झाला. तसेच एका कैद्याकडे फोन देखील आढळून आला होता. वारंवार घडणार्या या प्रकारांमुळे कारागृह प्रशासनाचा कारभार नेमका कसा चालतो, हेच समोर आले आहे.

गांजा बाळगणे, शासकीय कर्मचार्याला शिवीगाळ करत धमकी देणे या प्रकरणात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामधीतल आरोपी खोक्या भोसले याच्यासह इतर तिघांना आता न्यायालयाच्या परवानगीने ताब्यात घेणार असल्याची माहिती पीएसआय मोरे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT