रेशनच्या गहू-तांदळाचा काळा बाजार उघडीस; ट्रकसह चालक ताब्यात pudhari photo
बीड

Beed Crime: रेशनच्या गहू-तांदळाचा काळा बाजार उघडीस; ट्रकसह चालक ताब्यात

कारवाईमुळे रेशन धान्याच्या काळाबाजाराचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

धारूर : सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत (रेशन) लाभार्थ्यांसाठी असलेल्या गहू व तांदळाचा काळाबाजारासाठी वापर होत असल्याचा संशय असताना धारूर पोलिसांनी धडक कारवाई करत धान्याने भरलेला ट्रक आणि चालकाला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे रेशन धान्याच्या काळाबाजाराचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १० जून २०२६ रोजी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, केज यांना रेशनचा गहू व तांदूळ पोत्यांमध्ये भरून काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जात असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक इनामदार यांनी पोलीस अंमलदार जमीर शेख, गोविंद खाडे व नाना मुजमुले यांच्यासह सापळा रचून संशयित वाहनाचा शोध घेतला. कारवाईदरम्यान अशोक लेलँड कंपनीचा एमएच-४४ यू-३३३१ क्रमांकाचा ट्रक अडवून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात रेशनचा गहू व तांदळाची पोती आढळून आली.

यावेळी ट्रक चालक शेख कलीम शेख खलील (वय ३४, रा. आझाद नगर, धारूर) याला ताब्यात घेण्यात आले. वाहनासह जप्त करण्यात आलेला धान्यसाठा धारूर पोलीस ठाण्याच्या आवारात जमा करण्यात आला असून, संबंधितांविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT