Dharur Crime News pudhari photo
बीड

Dharur Crime News : धारूर पोलिसांची अवैध धंद्यावर कारवाई

रोख रकमेसह दारूसाठा जप्त; चार जणांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

धारूर: धारूर पोलिसांनी अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम राबवत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करून अवैध दारू विक्री व जुगार अड्ड्यावर कारवाई केली. या कारवाईत तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून देशी दारू, रोख रक्कम, मोबाईल फोन व जुगार साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

धारूर पोलीस ठाण्याच्या पथकाने 7 जून रोजी रात्री शहरातील गायकवाड गल्ली परिसरात छापा टाकून सीरसट (वय 70) यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून जी.एम. सफेद डॉक्टर कंपनीच्या 90 मिली क्षमतेच्या देशी दारूच्या 150 बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या दारूची अंदाजे किंमत 6 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संबंधित व्यक्ती विनापरवाना देशी दारूचा साठा करून विक्रीसाठी ठेवत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच 8 जून रोजी सकाळी धारूर तालुक्यातील घागरवाडा येथे हनुमान मंदिरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली.

यावेळी अश्विन मरस्के (वय 40) व सुनील नानाभाऊ नाईकवाडे (वय 36, दोघे रा. घागरवाडा) यांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून रोख 2 हजार 270 रुपये, एक मोबाईल फोन तसेच जुगार साहित्य असा एकूण 10 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या दोघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक केज यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.

कारवाईत धारूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र घुगे, पोलीस उपनिरीक्षक ढाकणे, पोलीस हवालदार दुधाने, अशोक कदम, गोविंद खाडे व नितीन काळे यांनी सहभाग घेतला.अवैध धंदे, जुगार व दारू विक्रीसारख्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात अशी मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT