धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाला गती; जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक File Photo
बीड

धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाला गती; जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

या बैठकीत रेल्वे विभागासह विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून प्रकल्पाच्या विविध बाबींवर सविस्तर चर्चा केली.

पुढारी वृत्तसेवा

Dharashiv-Beed-Chhatrapati Sambhajinagar Railway Line Gains Momentum; Review Meeting Held Under the Chairmanship of the District Collector

बीड, पुढारी वृत्तसेवा भारत सरकारच्या विकास धोरणाअंतर्गत प्रस्तावित धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी बीड यांच्या अध्यक्षतेखाली २७ मार्च २०२६ रोजी महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत रेल्वे विभागासह विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून प्रकल्पाच्या विविध बाबींवर सविस्तर चर्चा केली.

बीड, पुढारी वृत्तसेवा भारत प्रादेशिक विकासाच्या दृष्टीनेअत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या रेल्वे मार्गामुळे धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या भागांतील दळणवळण अधिक वेगवान व सुरक्षित होणार आहे. तसेच औद्योगिक, व्यावसायिक आणि कृषी क्षेत्राला चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. शिक्षण, आरोग्य व इतर मूलभूत सेवांसाठी ग्रामीण आणि शहरी भागांतील संपर्कही सुलभ होणार आहे.

प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी बीड जिल्ह्यातील केज, बीड व गे-वराई तालुक्यातील काही गावांमधील खाजगी जमीन संपादित होणार आहे. याशिवाय काही ठिकाणी वनविभागाची जमीन, राष्ट्रीय महामार्ग तसेच कालव्यांच्या क्षेत्राचाही समावेश या प्रकल्पात होणार आहे. यासंदर्भात विविध विभागांकडून आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र' मिळणेबाबत बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे विभाग व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधून संयुक्त पथक स्थापन करून प्रस्तावित मार्गाचे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. या रेल्वे मार्गाच्या उभारणीमुळे मराठवाड्यातील दळणवळणाचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता असून, आगामी काळात हा प्रकल्प विकासाचा नवा मार्ग ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT