Dhananjay Munde Pudhari
बीड

Vilas Ghule Case | विलास घुले हत्येप्रकरणी सर्व आरोपींची पाळेमुळे खणून खरा सूत्रधार शोधावा : धनंजय मुंडे

विलास घुलेच्या न्यायासाठी धनंजय मुंडेंचा विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन

पुढारी वृत्तसेवा

Dhananjay Munde Point Of Information Assembly

परळी वैजनाथ : केज तालुक्यात 20 जूनरोजी रात्री घडलेल्या दुर्दैवी घटनेत हत्येचा कट रचून हल्ला एकावर केला. मात्र, सोडवण्यासाठी आलेल्या विलास घुले याच्यावर वार करून हत्या करण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण पूर्वनियोजित कट असून याचा खरा सूत्रधार कोण, याचा शोध घेऊन विलास घुले याला न्याय मिळावा, यासाठी केजमध्ये हजारो लोक घुले कुटुंबियांच्या सोबत रस्त्यावर उतरले आहेत,

त्यामुळे पोलिस प्रशासनाने या प्रकरणात आरोपींची सर्व पाळे - मुळे खोदून काढत खरा सूत्रधार कोण आहे, याचा तपास करावा, अशी मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी मंगळवारी (दि.२३) विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केली आहे.

विलास घुले या निष्पाप तरुणाला विनाकारण आपले प्राण गमवावे लागले, याचा तीव्र निषेध करत कुटुंबीय व हजारो नागरिक रस्त्यावर उतरले असून, हत्येच्या आज चौथ्या दिवशी सुद्धा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यास घुले कुटुंबियांनी नकार दिला आहे. दुसरीकडे हजारो नागरिक रस्त्यावर उतरले असुन केजमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला असून, पोलिस ठाणे व अन्य ठिकाणी रस्ता रोको आंदोलन सुरू आहे.

दरम्यान, हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, या प्रकरणी कट रचून एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला तर दुसऱ्या व्यक्तीची हत्या असा दुहेरी गुन्हा घडलेला असून, पोलिस प्रशासनाने सर्व बाजूंनी वस्तुनिष्ठ तपास करून मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन सर्व आरोपींना अटक करावी, याबाबत केज पोलिसांना निर्देश दिले जावेत, अशी मागणी केली. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी धनंजय मुंडे यांच्या मागणीची तत्काळ दखल घेऊन योग्य कार्यवाहीचे निर्देश गृह विभागाला दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT