Dancer's custody extended in Berge suicide case
गेवराई, पुढारी वृत्तसेवा : लुखामसला येथील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नर्तकी पूजा देविदास गायकवाड हिला बार्शी न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस ठेवण्याचे कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
गोविंद बर्गे व पूजा गायकवाड यांची २०२४ मध्ये पारगाव येथील तुळजाभवानी कला केंद्रात ओळख झाली. पूजाने वारंवार पैशांची मागणी करून बर्गे यांच्याकडून महागडे मोबाईल, प्लॉट, शेतजमीन खरेदी करून घेतल्याचा आरोप आहे.
नवीन बंगला आपल्या नावावर करून दे, अन्यथा बलात्काराचा खटला दाखल करेन, अशी धमकीही तिने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दबावामुळे गोविंद बर्गे यांनी मंगळवारी गोळी झाडून आत्महत्या केली होती. सुरुवातीला तीन दिवसांची कोठडी मिळाल्यानंतर शनिवारी न्यायालयाने कोठडीत दोन दिवसांची वाढ केली.