Yogeshwari Devi : पूर्णाहुतीनतंर योगेश्वरीच्या दर्शनासाठी गर्दी file photo
बीड

Yogeshwari Devi : पूर्णाहुतीनतंर योगेश्वरीच्या दर्शनासाठी गर्दी

विजयादशमीला देवीच्या पालखी मिरवणुकीने होणार नवरात्र उत्सवाची सांगता

पुढारी वृत्तसेवा

Crowds of devotees gather for a glimpse of Yogeshwari

अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे शक्तीपीठ व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवी नवरात्र महोत्सवानिमित्त सोमवारी सकाळी 11.30 वाजता पूर्णाहुती, होमहवन व महापूजेन योगेश्वरी देवीची महापूजा झाली. अप्पर जिल्हाधिकारी अश्विनी जिरंगे सोनवणे व हरिश्चंद्र सोनवणे यांनी सपत्निक श्री योगेश्वरी देवीची विधिवत महापूजा केली.

या महापूजेनंतर देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. 11 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव साजरा होत आहे. सोमवारी सकाळी मंदिरात पूर्णाहुती व होमहवन होऊन महापूजा झाली. अपर जिल्हाधिकारी अश्विनी जिरगे (सोनवणे), हरिश्चंद्र सोनवणे यांनी विधीवत महापूजा केली.

सोमवारी झालेल्या महापूजेसाठी योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार विलास तरंगे, उपाध्यक्ष अक्षय मुंदडा, सचिव गिरधारीलाल भराडिया, सहसचिव कमलाकरराव चौसाळकर, कोषाध्यक्ष पूजा राम कुलकर्णी, उत्सव प्रमुख उल्हास पांडे, विश्वस्त आ. नमिता मुंदडा, राजकिशोर मोदी, पृथ्वीराज साठे, श्रीराम देशपांडे, विश्वस्त तथा मुख्य पुजारी सारंग पुजारी, गौरी जोशी, संजय भोसले, हंसराज देशमुख, शिरीष पांडे, प्रवीण दामा, राजन पुजारी यांच्यासह पुरोहित, मानकरी व भाविक उपस्थित होते. यावेळी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात व विधीवत महापूजेनंतर महाआरती झाली.

श्री योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी महिला व भाविकांची गर्दी झाली होती. महोत्सवात भाविकांसाठी देवल कमिटीच्या वतीने सर्व सेवा व सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. गेल्या आठवडाभरापासून मंदिर परिसरात धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने राज्यातून लोक योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. महोत्सवामुळे मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

देवीच्या पालखीने होणार महोत्सवाची सांगता

श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाची सांगता मंगळवारी होणार आहे. विजयादशमीच्या निमित्ताने देवीची पालखी सीमोल्लंघनासाठी शहरातून निघणार आहे. दुपारी 1 वाजता पालखी मंदिरातून निघणार आहे. प्रतिवर्षी ठरल्याप्रमाणे नियोजित मार्गाने पालखीचे मार्गक्रमण होणार आहे, अशी माहिती देवल कमिटीचे अध्यक्ष तहसीलदार विलास तरंगे सचिव गिरधारीलाल भरडिया यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT