Beed rain news: आष्टीत ढगफुटी ! गावांचा संपर्क तुटला  File Photo
बीड

Beed rain news : आष्टीत ढगफुटी ! गावांचा संपर्क तुटला

हेलिकॉप्टर, एनडीआरएफच्या मदतीने ५१ जणांना वाचविले

पुढारी वृत्तसेवा

Cloudburst in Ashti! Villages lost contact

राजू मस्के / प्रेम पवळ

आष्टी : तालुक्यातील कडा, पिंपरखेड, निमगाव चोभा, देवळाली, दौलावडगाव, घाट पिंपरी, दादेगाव, धामणगाव, डोंगरगण आदी भागांमध्ये रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे संपूर्ण परिसरात हाहाकार उडाला आहे. तब्बल ९६ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याने कडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. एक ते दोन किलोमीटर पात्र सोडून पाणी थेट गावांमध्ये व शेतांमध्ये घुसले. अनेक ठिकाणी पूल, रस्ते पाण्याखाली गेले. वाहने व जनावरे वाहून गेली, शेतजमिनींचे मोठे नुकसान झाले.

या भागाचे आमदार सुरेश धस यांनी पहाटेपासूनच घटनास्थळी पोहोचून नागरिकांना धीर दिला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याशी संपर्क साधत शासनस्तरावर मदत मागवली. आष्टी-पाटोदा-शिरूर कासार मतदारसंघाचे आमदार भीमराव धोंडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व तातडीने हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.

हेलिकॉप्टरद्वारे या नागरिकांना वाचविले

मौजे टाकळी अमिया येथील

१) शिवाजी महानवर

२) शकुंतला महानवर

३) साईनाथ महानवर

४) पारूबाई महानवर

५) शुभांगी महानवर

मौजे कडा येथील...

१) गोविंद सापते

२) योगेश सापते

३) आसराबाई सापते

४) मीनाबाई सापते

५) सुषमा सापते

६) आर्या सापते

७) काजल सापते

८) कृष्णा ससे

९) अमोल बेदरे

१०) आकाश बेदरे

११) सुमन बेदरे

मौजे शेरी खुर्द येथील...

१) महेश ढोबळे पाटील

२) विजय ढोबळे

३) प्रीती महेश ढोबळे

४) सुवर्णा विजय ढोबळे

५) राजदीप विजय ढोबळे

६) गयाबाई रामदास ढोबळे यांच्यासह इतरही नागरिकांना इंडियन आर्मी नाशिक यांच्या माध्यमातून रेस्क्यू करून रुग्णालयामध्ये तपासणीकरिता दाखल करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT