Gevrai Chemists and Druggists Association protest Pudhari
बीड

Gevrai Chemists Protest |ऑनलाईन औषध विक्रीविरोधात गेवराईत मुक मोर्चा

शास्त्री चौकातून निघालेल्या मोर्चाचा तहसील कार्यालयावर समारोप; नायब तहसीलदार कमल कुटे यांना निवेदन

पुढारी वृत्तसेवा

Gevrai Chemists and Druggists Association protest

गेवराई : देशभरात वाढत चाललेल्या ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना यांच्या हाकेला प्रतिसाद देत गेवराई केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने बुधवारी (दि. २०) शहरात मुक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये तालुक्यातील औषध विक्रेते, मेडिकल चालक व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शहरातील शास्त्री चौकातून मोर्चास प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर प्रमुख मिरवणूक मार्गाने तहसील कार्यालयावर मोर्चाचा समारोप करण्यात आला. “ऑनलाईन औषध विक्री बंद करा”, “स्थानिक मेडिकल व्यवसाय वाचवा”, “बनावट औषध विक्री रोखा” अशा विविध मागण्यांचे निवदेन दिले मुक मोर्चामुळे शहरातील प्रमुख मार्गावर काही काळ वेगळे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी नायब तहसीलदार कमल कुटे यांनी संघटनेच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. निवेदनात ऑनलाईन औषध विक्रीमुळे स्थानिक मेडिकल व्यवसायावर गंभीर परिणाम होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अव्यावसायिक सवलतींमुळे छोट्या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे नमूद करण्यात आले.

याशिवाय ऑनलाईन माध्यमातून औषध विक्री होत असल्याने वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधे सहज उपलब्ध होत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. बनावट औषध विक्री रोखण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत तसेच ऑनलाईन औषध विक्री तात्काळ बंद करावी, अशी मागणी करण्यात आली. या मोर्चात संघटनेचे पदाधिकारी सह तालुक्यातील अनेक औषध विक्रेते सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT