Chakalamba police caught two tractors transporting sand
चकलांबा, पुढारी वृत्तसेवा: बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी जिल्ह्यात अवैध धंद्यावर कठोर कारवायाच्या दिलेल्या सुचनेनुसार चकलांबा पोलिसांच्या वतीने कारवाईचा धडाका लावला आहे. मौजे राक्षसभूवन येथे गोदावरी नदी पात्रात वाळू ची अवैध चोरी करणारे दोन ट्रॅक्टर सपोनि संदीप पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत १४ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दिनांक १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ०२.०० वाजता गोपनीय माहिती मिळाल्यावरून सापळा रचून पोलिसांनी गोदावरी नदी पात्रामध्ये दोन ट्रॅक्टर ताब्यात घेतले. यावेळी ट्रॅक्टरमध्ये वाळूची चोरट्या मार्गाने तस्करी करण्यात येतं असल्याचे समोर आले असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, पोलीस उपाधीक्षक श्री. कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप पाटील, चांदमारे पोह / पवार,, प्रशांत घोंगडे, विनोद सुरवसे यांनी केली.