Beed News : विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार करिअरची निवड व्हावी  file photo
बीड

Beed News : विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार करिअरची निवड व्हावी

प्रो. डॉ. सतीश दांडगे यांचे प्रतिपादन; 'तुलसी'मध्ये गुणवंतांचा सत्कार

पुढारी वृत्तसेवा

Career choices should be made according to the students' interests

बीड, पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थ्यांना समजून घेऊन पालक व शिक्षकांनी त्यांच्या करिअरबाबत योग्य मार्गदर्शन करण्याची आज मोठी गरज आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वेगळी क्षमता असते, ती ओळखून त्याला योग्य क्षेत्राची निवड करून देणे महत्त्वाचे आहे. पालकांनी मुलांवर केवळ अपेक्षांचे ओझे न टाकता त्यांच्या आवडीनुसार त्यांना प्रोत्साहन दिल्यास ते जीवनात निश्चितच मोठे यश संपादन करू शकतात, असे प्रतिपादन प्रो. डॉ. सतीश दांडगे यांनी केले.

देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी इंग्लिश स्कूल व तुलसी कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने दहावी व बाराबीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा तुलसी समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे, प्रा. संजय खाडे, प्राचार्या उमा जगतकर, प्राचार्य प्रा. प्रकाश ढोकणे आदी मान्यवर उपस्थित होते. दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, तुलसी समूहाचे पुस्तक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद सिद्धीक यांनी केले. याप्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

वेळेचा सदुपयोग करा : प्रा. प्रदीप रोडे

प्रा. प्रदीप रोडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, क्षेत्र कोणतेही असो, त्या क्षेत्रातील सर्वोच्च यश संपादन करण्याचे ध्येय विद्यार्थ्यांनी ठेवले पाहिजे. मोबाईल व वेळेचा सदुपयोग करून मेहनत, वाचन आणि कौशल्य विकासावर भर दिल्यास यश मिळते, विद्यार्थ्यांनी स्वयंप्रकाशित होऊन करिअर स्वतः घडवावे. जगात बदल घडवायचा असेल तर प्रथम स्वतःमध्ये बदल घडवावा लागतो, असेही सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT