धारुर येथे कोसळलेला टॉवर 
बीड

Beed : धारुर | वादळी वाऱ्यामुळे बीएसएनएल टॉवर कोसळला; तीन बालिकांसह दोघे जखमी

करण शिंदे

धारुर, पुढारी वृत्तसेवा : धारुर येथील संभाजीनगर झोपडपट्टी भागात असलेला बीएसएनएल टॉवर शनिवारी (दि.11) कोसळला. सायंकाळी 5 च्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे झालेल्या या घटनेत एकाच कुटूंबातील तीन बालिकांसह दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. यासोबतच शहरातील विद्युत खांबावर बाभळी कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. (Beed News)

शनिवारी (दि.11) अचानक झालेल्या वादळी पावसामुळे सदर टॉवर जमीनदोस्त झाला असून, टॉवरचा काही भाग राहत्या घरावर पडल्यामुळे एकाच कुटूंबातील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात राधा कौर (वय 8), पुनम कौर (वय 6), दस्मित कौर (वय 5), गंगा कौर (वय 22) योगिंदर सिंग (वय 25) अशी जखमींची नावे आहेत. या घटनेनंतर जखमींना ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी पाठवण्यात आले. यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तीस वर्षापूर्वी बीएसएनएलकडून एसटीडी सेवेसाठी टॉवर उभारण्यात आले होते. सद्य स्थितीत हा टॉवर बंद अवस्थेत होता. काही दिवसांपुर्वी या टॉवरचा एक भाग कोसळला होता. याबाबत प्रसार माध्यमातून अनेक वेळा वृत्त प्रसारितकरुन दुरसंचार विभागाला कळवण्यात आले होते. याभागात शिकलकरी समाजाची घरे असून त्यांना धोका असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. मात्र या टॉवरकडे बीएसएनएल विभागाचे दुर्लक्ष केले होते. दरम्यान शहर परिसरात वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे देखील उनमळून पडली आहेत. (Beed News)

लोकांच्या प्रश्नाकडे धारुरच्या राजकीय पुढार्‍यांकडून दुर्लक्ष

मागील कित्येक वर्षापासून बीएसएनएल कार्यालयामध्ये कर्मचारी नसल्याने कार्यालय बंद अवस्थेत आहे. ग्राहकांना अडचणी असल्यास केज कार्यालयामध्ये जावे लागते. उभा केलेला टॉवरचा उपयोग नव्हता ते फक्त शोभेची वस्तू होती मग हे टावर काढले का नाही? असा प्रश्न तेथील नागरिक करत आहेत. या अगोदरही त्या टॉवर वरील पत्रा कोसळून पडल्याची घटना घडलेली आहे. बाजूला मोठी वस्ती आहे. विरुद्ध दिशेने टॉवर वस्तीवर पडले असते तर शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला असता. कित्येक वर्षापासून कार्यालय बंद अवस्थेत आहे, याकडे कोणत्याही शहरातील राजकीय पुढाऱ्याने हस्तक्षेप केला नाही. फक्त मतदानापुरते धारूरकर आहेत का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT