ग्रामसेवक लाचलुचपतच्या जाळ्यात (Pudhari File Photo)
बीड

Bribe Case : ग्रामसेवक सोपान मुसळे लाच घेताना रंगेहात जेरबंद

या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Bribery Case: Gram Sevak Sopan Musale Caught Red-Handed While Accepting a Bribe

गेवराई : पुढारी वृत्तसेवा

बीड जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना, संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून कोणताही धडा घेतला जात नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. तलवाडा येथील ग्रामसेवक सोपान मुसळे यास पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तक्रारदाराकडून पीटीआर (Property Transfer Report) देण्यासाठी मुसळे यांनी सुरुवातीला दहा हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम पाच हजारांवर निश्चित झाली. याप्रकरणी तक्रारदाराने जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

त्यानुसार, २० एप्रिल २०२६ रोजी गेवराई येथील कार्यालयात सापळा रचण्यात आला. यावेळी सोपान मुसळे हे तक्रारदाराकडून ५,००० रुपयांची लाच स्वीकारताना त्‍यांना रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई जालना एसीबीचे उपअधीक्षक बाळासाहेब जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT