Beed Bribe Case : परळीत ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

 Bribe Case
Bribe CaseFile Photo
Published on
Updated on

परळी वैजनाथ : बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (दि. ८ एप्रिल) परळीत यशस्वी सापळा कारवाई करत ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.या प्रकरणातील आरोपी दशरथ देविदास गोरे (वय ४८) हे ग्रामपंचायत अधिकारी असून जिरेवाडी ग्रामपंचायतीसह पिंपळगाव (गाडे) येथे अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते.

तक्रारदार (वय ५४) यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत २०२३-२४ मध्ये मंजूर झालेल्या जलसिंचन विहिरीचे काम पूर्ण केले होते. संबंधित कामाच्या कुशल बिलावर सही करण्यासाठी आरोपीने तक्रारदाराकडे १००० रुपयांची लाच मागितली होती. लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने बीड एसीबीकडे ८ एप्रिल रोजी तक्रार दाखल केली.

त्यानंतर पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली असता आरोपीने तडजोडी अंती ५०० रुपये स्विकारण्यास मान्यता दिली.यानुसार विद्यानगर, परळी येथील एका खाजगी कार्यालयात सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ५०० रुपये स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आरोपीला रंगेहात पकडले. कारवाईदरम्यान आरोपीकडून लाच रक्कम तसेच मोबाईल जप्त करण्यात आला असून त्याचे तांत्रिक विश्लेषण सुरू आहे.

तसेच घरझडतीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक समाधान कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पोलीस उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले तपास करत आहेत. वरिष्ठ अधिकारी म्हणून पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे व अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे यांनी मार्गदर्शन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news