Gevarai Balraje Pawar police custody
गेवराई : भारतीय जनता पक्षाचे नेते बाळराजे पवार यांना सोमवारी रात्री अटक करण्यात आली. स्वतः पवार हे गेवराई पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाले होते. त्यानंतर, त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. मंगळवारी (दि. 16) पवार यांना गेवराई न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत युवा नेते बाळराजे पवार आणि माजी आमदार अमरसिंह पंडित गटात राडा झाला होता. दोन्ही गट आमने सामने आले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहायक अमृत डावकर यांच्या तक्रारीवरून आणखी एक कलम वाढवून पोलिसांनी सोमवारी पाचजणांना अटक केली होती. मंगळवारी अटक झालेल्यांना गेवराई न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.