परळीत भर रस्त्यावर उभा असलेल्या या ट्रकने असा पेट घेतला.  pudhari photo
बीड

Beed Truck Fire: परळीत भर रस्त्यावर ट्रक पेटला

Truck Fire: आगीसह धुराचे लोट भिडले गगनाला !

पुढारी वृत्तसेवा

Burning truck incident

परळी वैजनाथ : परळी वैजनाथ शहरातील बीड व परभणीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज चौक (इटके कॉर्नर) या ठिकाणी भर उन्हात, भरस्त्यावर दुपारी ४.३० च्या सुमारास उभ्या ट्रकला आग लागून हा ट्रक पेटला.

आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या घटनेने जवळपास पाऊण तास पेटलेल्या ट्रकचा थरार बघायला मिळाला. नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने ही आग आटोक्यात आणली आहे.

परळी शहरात असलेल्या इटके कॉर्नर वर बीडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एक एम एच 24 |7896 या क्रमांकाचा ट्रक उभा होता. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक या ट्रक मधून आगीचे लोळ बाहेर येताना दिसले. बघता बघता या ट्रक वरून आगीचे लोट उठल्याचे दिसून आले. संपूर्णत: पेटलेला ट्रक नागरिकांना दिसला.

तातडीने नागरिकांनी परळी नगरपरिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला फोन केला. लगेचच नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या त्याचबरोबर औष्णिक विद्युत केंद्राची एक अग्निशमन गाडी घटनास्थळी दाखल झाली.

हा थरारक पेटलेला ट्रक व आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर केले. सर्व बाजूंनी संपूर्णतः ट्रक पेटला होता. त्यामुळे आगीचे व धुराचे लोट संपूर्णतः आकाशाला भिडल्याचे दिसून येत होते. त्यामुळे बीडकडे व परभणीकडे जाणारी वाहतूकही ठप्प झाली होती.

तब्बल पाऊण तासानंतर या ट्रकला लागलेली आग विझवण्यात अग्निशमन विभागाला यश मिळाले आहे. दरम्यान उभ्या ट्रकला नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलीस प्रशासन व संबंधित प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहचली असुन चौकशीअंती ही आग लागण्याचे कारण स्पष्ट होणार आहे. परंतु उभा पेटलेला ट्रक चा थरार बघण्यासाठी मात्र घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT