तरूणास जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद file photo
बीड

Beed Crime News : तरूणास जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद

धर्मराज बडे जीवन संपवल्याचे प्रकरण तीन जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

beed Three people against case registered for youth ending life

दिंद्रुड: पुढारी वृत्‍तसेवा माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीत शुक्रवारी सकाळी गळफास घेतलेल्या अवस्थेत एका तरुणाचे प्रेत आढळून आले होते. दरम्यान नातेवाईकांनी सावकाराने पैशाचा तगादा लावत केलेल्या जाचामुळे जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करा अन्यथा पोलीस स्टेशनला अंत्यविधी करू असा पवित्रा शुक्रवारी सायंकाळी घेतला होता. यामुळे जवळपास साडेचार तास पोलीस स्टेशनच्या आवारात तणाव निर्माण झाला होता?

मृत मुलाच्या चुलत्याच्या फिर्यादीवरून अखेर जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याबाबत तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला. यानंतर रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास गांवदरा येथे शोकाकुल वातावरणात मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

धर्मराज अर्जुन बडे (वय २२ वर्ष रा.गावंदरा ता. धारूर ) मृत तरुणाचे नाव असून त्याचे प्रेत कारी शिवारात एका शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास आढळून आले. दिंद्रुड पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले होते, मात्र नातेवाईकांनी हे जीवन संपवण्याचे प्रकरण नसून हत्या असल्याचा आरोप केला.

अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी नातेवाईकांनी पोलिसांसमोर धरली. दरम्यान सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास स्वाराती रुग्णालय अंबाजोगाई येथे शवच्छेदनानंतर या प्रकरणातील आरोपींवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी मृत धर्मराजचे प्रेत दिंद्रुड येथील पोलीस स्टेशनला नातेवाईकांनी आणले.

सायंकाळी साडेसात वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत पोलिस स्टेशन आवारात प्रेत ठेवून नातेवाईकांनी घातलेल्या गोंधळामुळे तणाव निर्माण झाला होता. अखेर मृत धर्मराजचा चुलता नवनाथ श्रीरंग बडे यांच्या फिर्यादीवरून बालासाहेब लक्ष्मण कांबळे, कौंताबाई बालासाहेब कांबळे व भागवत अनुरथ वेताळ या तिघांवर जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याबाबत विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तर नंतर प्रेत गावंदरा येथे नेत नातेवाईकांनी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT