शिरुर : शेजाऱ्यांच्या घराला कड्या घालून तीन अज्ञात चोरट्यांनी विरोध करणाऱ्या घर मालकाच्या डोक्या, तोंडावर लोखंडी हत्याराचे घाव करून सुमारे 1 लाख 66 रुपये किंमतीची दागिने व रोकड पळवले. ही घटना शिरूर कासार तालुक्यातील हनुमानवाडी (मानूर) येथे सोमवार दि. 16 जूनच्या मध्यरात्री घडली आहे.
शिरूर कासार तालुक्यातील हनुमानवाडी( मानूर ) येथील रहिवासी असलेले भागवत बाळाभाऊ तुपे (55) यांचे गावातच रस्त्यालगत घर आहे. या घरांमध्ये भागवत बाळासाहेब तुपे व पत्नी सरस्वती भागवत तुपे हे दाम्पत्य मुले बाहेरगावी असल्याकारणाने दोघेच घरामध्ये झोपले होते. सोमवार दि. 16 जूनच्या मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास अज्ञात तीन चोरट्यानी घर मालकांच्या मदतीला कोणी येऊ नये म्हणून शेजाऱ्यांच्या घराला बाहेरून कड्या घालून भागवत तुपे यांच्या प्रवेश केला.
घरामध्ये चाफाचाफी करत घरातील व सरस्वती भागवत तुपे या घरमालकिनीच्या अंगावरील सुमारे 1 लाख 66 हजार रुपयांची दागिने व रोकड पळवली आहे. घर मालक भागवत तुपे यांनी या चोरट्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला चोरट्यांनी हातातील लोखंडी हत्याराचे तुपे यांच्या डोक्यावरती, तोंडावरती, अंगावरती जबर घाव केले. यामध्ये तुपे हे चांगलेच जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना शिरूर येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र तुपे हे गंभीर जखमी झाल्यामुळे पुन्हा त्यांना अहिल्यानगर कडे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
सदरील घटनेची माहिती शिरूर पोलीस स्टेशनला मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव यांनी आपल्या फौज फाट्यासह भल्या पहाटेच घटनास्थळी धाव घेतली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सपोनि जाधव यांनी श्वान पथक, फिंगर प्रिंट एक्सपर्ट पथक, व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची पथके पाचारण करून सपोनि जाधव यांनी मंगळवारी तपासाची चक्रे गतिमान केली होती. मात्र सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोलिसांना चोरट्यांचा काही सुगावा लागला नाही. दरम्यान याप्रकरणी सरस्वती भागवत तुपे यांच्या फिर्यादीवरून तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव हे करत आहेत.
शिरूर तालुक्यातील हनुमानवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी भागवत तुपे यांच्या डोक्यामध्ये, तोंडावरती घर उघडण्याची लोखंडी पक्कड मारून त्यांना गंभीर जख्मी करून सुमारे 1 लाख 66 हजार रुपयाचा मुद्देमाल पळवला आहे. या घटनेची माहिती शिरूर पोलिसांना मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेत स्वरा तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. चोरट्याकडून चोरीसाठी वापरण्यात आलेले लोखंडी पक्कड व घटनास्थळी इतर साहित्य काही जप्त ही करण्यात आले आहे. या घटनेबाबत पोलीस प्रशासनाने गांभीर्याने घेतले असून शिरूर पोलीस तपासा बाबतीत सतर्क होऊन आगेकूच करीत असल्याची माहिती शिरूर पोलीस स्टेशनचे सपोनी प्रवीण जाधव यांनी दिली आहे.