Beed Skulls, skeletons found in tempo
बीड, पुढारी वृत्तसेवा बीड जिल्ह्यात गोवंशाचे कत्तल होण्याचे प्रमाण वाढले असून, चोरट्या पद्धतीने गाय, बैल, कालवड, म्हैस सारख्या प्राण्यांची वाहतूक करून निर्मनुष्य ठिकाणी ही कत्तल करून गोमाता व गोवंशाचे सापळे, शिर, कातडी, हाडे, कातडी, सांगाडे इ. सह अन्य गोष्टी पुरावा सापडू नये म्हणुन नष्ट करण्याच्या उद्देशाने बीड शहराच्या सोबतच अन्य ग्रामीण परिसरात तसेच निर्मनुष्य भागात नेऊन बिल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने पुरण्यात येत आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वीच बीड शहराच्या जवळ असलेल्या गोरे वस्ती, बांगरनाला परिसरात असेच २५ ते३० गोवंशाची हत्या केलेली आढळून आलेली होती, यातील आरोपी निष्पन्न होऊन अटक होण्याच्या आधीच केज तालुक्यात दुसरी घटना घडल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण होत आहे.
हिंदू धर्माच्या दृष्टीने पवित्र असलेल्या आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे दिनांक ०६ जुलै २०२५ बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील बिडा ते शेंडी मार्गावर कारेगाव या ठिकाणी एक आयशर (ट्रक) भरून गोवंशाचे मुंडके हाडे जात असल्याची माहिती गोरक्षक केशव रत्नपारखे व अन्य यांना मिळताच तातडीने डायल ११२ वर कॉल करून माहिती देत गोरक्षकांनी ही गाडी अडवली असता यात अंदाजे ४००- ५०० गाय, बैल, म्हैस, कालवड यांच्या कत्तल केल्याली असल्याचे प्राथमिक दिसून आले, प्रकरणाचे गांभीर्य ओळखत केज पोलिस स्टेशनचे पीआय उनवने यांच्या पथकाने तातडीने या ठिकाणी धाव घेत प्रकरणाची खातरजमा केली असता एक विटकरी रंगाचा आयशर टॅम्पो हा रोडच्या बाजूला ऊभा होता.
त्याची पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये अवैधरित्या गायी, म्हशी व बैल यांचे हाडांचे सांगाडे, मुंडक्याच्या कवट्या, पायांचे सांगाडे मांस व हाडे असे भरलेले मिळून आले, सदर गाडी चालक नाव अकबर ईस्माईल टकारी व गाडी मालक अमीर ईस्माईल पठाण याची गाडी असल्याचे सांगीतले. चालकाने सांगितले की, सदर माल हा धाराशिव येथुन तौफीक भाई खुरेशी (रा. ख्वाजा नगर धाराशिव) यांचेकडुन भरलेला आहे व नेकनुरचा अतिक (रा. नेकनुर ता. बीड) याच्याकडे माल घेऊन जात असल्याचे कबूल केले आहे सदर मालाची तपासणी पशु वैद्यकीय अधिकारी व पशुडॉक्टर यांनी पाहणी केली असता ५ टन वजनाचे गायी, म्हसी व बैल यांचे हाडांचे सांगाडे, मुंडक्याच्या कवट्या, पायांचे सांगाडे व मांस व हाडे असा एकूण ८ लाखाचा मुददेमाल मिळून आलेला आहे.
यात केज पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकबर ईस्माईल टकारी, अमीर ईस्माईल पठाण, तौफीक भाई खुरेशी, अतिक यांचे विरुध्द प्राण्याचा छळ प्रतीबंधक अधिनीयम १९६० चे कलम ११ (१) महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनीयम १९७६ कलम ५, महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम ११९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. परंतु या प्रकरणात मोठी साखळी असून याचे धागेदोरे हे बीड, धाराशिव, संभाजीनगर, मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांपर्यंत पसरलेले असून या आरोपींच्या सखोल चौकशी करून यांच्यामागे असलेल्या यांच्या टोळ्यांची माहिती घेऊन अश्या सर्व आरोपींवर मकोका व एमपीडिए कायद्याअंतर्गत कठोर शिक्षा करावी अशी मागणी संघ जागरण गटाचे किशन चौहाण, विश्व हिंदु परिषदेच्या वतीने प्रशांत डोरले, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मसुर भालेकर, भगवाधारी ग्रुपचे कृष्णा जाधव यांच्यासह सर्व गोरक्षकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
मुंबई येथील साकीनाका या परिसरात झालेल्या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणावर गोमांसाची कत्तल झाल्याचे पुरावे असून त्याचे कनेक्शन ही बीड जिल्ह्यातीलच असल्याचे चांदिवलीचे आ. दिलीप लांडे यांनी विधानसभा अधिवेशनात कालच तारांकित प्रश्न करत माहिती दिली आहे.