नसरापूर येथील घटनेच्या निषेधार्थ बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेला जनआक्रोश मोर्चा. pudhari photo
बीड

Beed protest Nasrapur case : नराधमाला फाशीच हवी! नसरापूर घटनेच्या निषेधार्थ बीडमध्ये जनआक्रोश

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला भव्य मोर्चा; जलदगती सुनावणीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

बीड : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे अल्पवयीन चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचारामुळे संपूर्ण राज्य हादरले असून, या घटनेचे तीव्र पडसाद आज बीडमध्ये उमटले. “नराधमाला मृत्युदंडच झाला पाहिजे“ या एकमुखी मागणीसाठी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, वकील, डॉक्टर आणि सर्वपक्षीय नेत्यांसह विविध संघटनांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.

हातात निषेधाचे फलक, बॅनर आणि आरोपींविरुद्धचा संतापअशा वातावरणात निघालेल्या या मोर्चाने शहर दणाणून सोडले. “आरोपीला फाशी द्या!”, “पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे!” अशा घोषणांनी परिसर हादरला होता. प्रत्येक घोषणेतून नागरिकांमधील तीव्र वेदना आणि संतापाची लाट स्पष्टपणे जाणवत होती.

मोर्चाच्या शेवटी आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या प्रकरणाची जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) सुनावणी करून नराधम आरोपीला तात्काळ मृत्युदंडाची शिक्षा द्यावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. “अशा विकृत प्रवृत्तीच्या नराधमांना जिवंत ठेवण्याचा अधिकार नाही,” असा संतप्त सूर आंदोलकांनी व्यक्त केला.

केवळ निषेध नको, तर ठोस आणि कठोर कृतीची गरज असल्याचे मत नागरिकांनी यावेळी मांडले. “दरवेळी घटना घडते, संताप व्यक्त होतो आणि नंतर सर्व काही शांत होतेहा प्रकार आता थांबला पाहिजे,” असा रोखठोक इशाराही देण्यात आला. महिलांच्या सुरक्षेबाबत शासनाने केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

या आंदोलनात वकील, डॉक्टर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नसरापूर येथील घटनेने पेटलेला संताप आता संपूर्ण समाजात अस्वस्थता निर्माण करत असून, न्यायासाठी ही आक्रोशपूर्ण हाक प्रशासनापर्यंत पोहोचली आहे.

  • केवळ निषेध नको, तर ठोस आणि कठोर कृतीची गरज असल्याचे मत नागरिकांनी यावेळी मांडले. “दरवेळी घटना घडते, संताप व्यक्त होतो आणि नंतर सर्व काही शांत होतेहा प्रकार आता थांबला पाहिजे,” असा रोखठोक इशाराही देण्यात आला. महिलांच्या सुरक्षेबाबत शासनाने केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT