बीड मतदार संघातील वर्चस्वावरून पंडित-क्षीरसागरांमध्ये सुप्त संघर्ष pudhari photo
बीड

Beed Political News : बीड मतदार संघातील वर्चस्वावरून पंडित-क्षीरसागरांमध्ये सुप्त संघर्ष

आ.पंडितांचा बैठकांचा सपाटा; आ.क्षीरसागरांनी घेतला आक्षेप

पुढारी वृत्तसेवा

बीड ः बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदिप क्षीरसागर आहेत, त्यामुळे बीडमधील विविध प्रश्नांवर त्यांनीच आढावा घेणे अपेक्षित असतांना गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित हे बीडमध्ये वारंवार बैठका घेत आहेत. या सर्व प्रकारामुळे नाराज झालेल्या आ.संदिप क्षीरसागरांनी प्रशासनाकडे आक्षेप नोंदवताच प्रशासनाने बीडमधील विषय वगळुन नवे पत्र काढत त्यावर बैठक आयोजीत केली.

बीड नगरपालिका निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आ.विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला. तेव्हापासून आ.पंडित हे बीडच्या विविध प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करत आहेत. नगरपालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर ते बैठका देखील घेत असल्याचे यापूर्वी दिसले होते. दरम्यानच्या काळात आ.संदिप क्षीरसागर यांनीही या प्रकाराकडे दुर्लक्ष केले.

परंतु वारंवार अशा पद्धतीने बैठका घेतल्या जात असल्याने यावर आ.क्षीरसागरांनी थेट प्रशासनाकडे आक्षेप नोंदवला. सोमवार दि.11 रोजी बीड व गेवराई विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांवर आ.विजयसिंह पंडित यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजीत केली होती.

ही बाब आ.संदिप क्षीरसागर यांना समजताच त्यांनी याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली. बीड मतदारसंघातील विषयांवर माझ्या उपस्थितीशिवाय बैठक कशी काय घेतली जाऊ शकते, असा सवाल आ.क्षीरसागरांनी उपस्थित केला.

ही बाब आ.संदिप क्षीरसागर यांना समजताच त्यांनी याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली. बीड मतदारसंघातील विषयांवर माझ्या उपस्थितीशिवाय बैठक कशी काय घेतली जाऊ शकते, असा सवाल आ.क्षीरसागरांनी उपस्थित केला.

हा मुद्दा अधिकाऱ्यांनाही पटल्याने त्यांनी बीडचे विषय वगळून केवळ गेवराई मतदारसंघातील विषयांवर बैठक आयोजीत केल्याचे नवीन पत्र काढले. या सर्व प्रकारामुळे मात्र बीड मतदारसंघावरील वर्चस्वाच्या मुद्यावरुन पंडित व क्षीरसागरांमध्ये सुप्त संघर्ष सुरु असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान दोन आमदारांमध्ये अशा पध्दतीने वर्चस्वावरून सुप्त संघर्ष सुरू असतांना अधिकाऱ्यांची मात्र पंचाईत होत आहे. विशेषत: नगर पालिकेच्या कामकाजात आ.पंडित यांचे लक्षत असते त्याठिकाणी ते वारंवार बैठका घेतांना दिसतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT