Beed News : पाडळसिंगी टोल नाक्यावर पोलिसांना भरधाव कारने उडवले; दोघे जखमी file photo
बीड

Beed News : पाडळसिंगी टोल नाक्यावर पोलिसांना भरधाव कारने उडवले; दोघे जखमी

महामार्गावर अपघात रोखण्यासाठी आणि वाहनांची सुरक्षितता राखण्यासाठी तैनात असलेल्या पोलिसांनाच भरधाव कारने धडक दिल्याची घटना पाडळशिंगी टोलनाक्यावर शनिवारी (दि. 31) रात्री घडली.

पुढारी वृत्तसेवा

Beed News: Police were hit by a speeding car at Padalsingi toll plaza; Both injured

बीड, पुढारी वृत्तसेवा : महामार्गावर अपघात रोखण्यासाठी आणि वाहनांची सुरक्षितता राखण्यासाठी तैनात असलेल्या पोलिसांनाच भरधाव कारने धडक दिल्याची घटना पाडळशिंगी टोलनाक्यावर शनिवारी (दि. 31) रात्री घडली. इंडिका विस्टा कारने पोलीस कर्मचारी बाळकृष्ण म्हेत्रे आणि सचिन पवळ यांना धडक देऊन घटनास्थळावरून पळ काढला. या अपघातात दोन्ही कर्मचारी जखमी झाले असून, त्यांच्यावर बीडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोळवाडी फाट्याजवळ चार अपघातांत दोघांचा मृत्यू, तर सहा जण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच पाडळशिंगी टोलनाक्याजवळही अपघात घडला. त्यामुळे महामार्ग सुरक्षा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

यावेळी पोलीस कर्मचारी बाळकृष्ण म्हेत्रे आणि सचिन पवळ हे रस्त्यावर उभे होते. त्यांनी इंडिका विस्टा (एमएच 23 एडी 0012) या कारला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने दोन्ही पोलिसांना धडक देत वाहनासह पळ काढला.धडकेत दोन्ही कर्मचारी जखमी झाल्याने त्यांना तातडीने बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांचीच सुरक्षा धोक्यात !

महामार्गावर नागरिकांच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनाच वाहनांची धडक बसत असेल, तर सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेचे काय, असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे. धडक देऊन पळून गेलेल्या कारचालकाचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT