Beed News : शेख कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी बीड शहरात विराट मोर्चा file photo
बीड

Beed News : शेख कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी बीड शहरात विराट मोर्चा

ऊसतोड मजुराचा संशयास्पद मृत्यू; सत्य समोर आणण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Beed News : Massive march in Beed city to get justice for Shaikh family

बीड, पुढारी वृत्तसेवा : पाटोदा तालुक्यातील ऊसतोड मजूर आरेफ शेख यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात संबंधित मुकादमानेच खून केल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी व्हावी या प्रमुख मागणीसाठी सोमवारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.

पाटोदा तालुक्यातील ऊसतोड मजूर आरेफ शेख यांना मुकादम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बळजबरीने अंमळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत नेले होते. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली. कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले असता, आरेफ यांना गाडीने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. परंतु, आरेफ यांना गंभीर मारहाण करण्यात आली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. अशी तक्रार करणाऱ्या कुटुंबीयांना पोलिसांनीच धमकावल्याचा गंभीर प्रकारही समोर आला होता.

या प्रकारानंतर सामाजिक कार्यकर्ते बाळा बांगर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत चौकशीची मागणी केली होती. मात्र, त्यावर कोणतीही ठोस पावले उचलली न गेल्याने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

जात-धर्म विसरून एकत्र येण्याचे आवाहन

मोर्चादरम्यान बोलताना बाळा बांगर यांनी सर्वांनी जात-धर्म विसरून शेख कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र यायला हवे, असे आवाहन केले. पोलिस अधिकारी या प्रकरणात काहीतरी दडवण्याचा प्रयत्न करत असून सत्य समोर आले पाहिजे, यासाठी विशेष तपास पथक (SIT) नियुक्त करावे अशी मागणी त्यांनी केली. या मोर्चात बीड शहरातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते तसेच पाटोदा येथून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT