Beed News : माता, बाल संगोपनात बीड पहिल्या क्रमांकावर file photo
बीड

Beed News : माता, बाल संगोपनात बीड पहिल्या क्रमांकावर

आरोग्य विभागाकडून पहिल्या आणि शेवटच्या पाच जिल्ह्यांची नावे जाहीर

पुढारी वृत्तसेवा

Beed News: Beed Ranks First in Maternal and Child Care

बीड, पुढारी वृत्तसेवा : कुटुंब कल्याण, माता बाल संगोपन व लसीकरण कार्यक्रमांतर्गत मार्च महिन्यात बीड जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. यामध्ये बाल आरोग्य कार्यक्रम, नियमीत लसीकरण व कुटुंब नियोजन कार्यक्रमातील कामगिरीचा समावेश आहे तर सिंधुदुर्ग हा जिल्हा सर्वात शेवटी असून या जिल्ह्याला अवघे ४१ गुण मिळाले आहेत.

राज्यात माता मृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, लसीकरण, मार्गदर्शन योग्य पद्धतीने केले जावे यासाठी माता बाल संगोपन विभागाकडून विशेष उपक्रम राबवले जातात. यामध्ये कुटुंब कल्याण, माता बाल संगोपन व नियमित लसीकरण कार्यक्रम राबवण्यासाठी आरोग्य विभागाकडून उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते.

यामध्ये माता आरोग्य कार्यक्रमांतर्गत गरोदर माता नोंदणी (१०५ टक्के), १२ आठवड्यापूर्वी प्रसूतिपूर्व नोंदणी (८९ टक्के), गरोदर मातांचे लसीकरण (९७ टक्के), आयएफ ए १८० गोळ्या (१११ टक्के) यासह बाल आरोग्य, नियमित लसीकरण, कुटुंब नियोजन कार्यक्रमात उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. यात बीड जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने ९१ गोंदिया, वर्धा व यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांची कामगिरी देखील तितकी चांगली नसून आता आरोग्य विभागाकडून या सर्वच जिल्ह्यांचा आढावा घेत कामगिरी सुध- ारणा करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

अधिकारी, कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे

माता बाल संगोपन आरोग्य कार्यक्रमात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने योगदान दिलेले आहे. विशेषतः थेट प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात कार्यरत कर्मचाऱ्यांचे यात सहकार्य आहे, त्या सर्वांच्या सहकार्यामुळेच बीड जिल्हा प्रथम क्रमांक मिळवू शकला अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी दिली. यावेळी जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. शेकडे यांची उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT