Beed-Nagar railway to start on Mukti sangram din
बीड, पुढारी वृत्तसेवा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी घेतलेल्या धडक निर्णयामध्ये आणखी एक ऐतिहासिक भर पडली आहे. गेल्या चार दशकांपासून रखडलेला बीड-नगर रेल्वे प्रकल्प अखेर प्रत्यक्षात येणार असून, येत्या १७ सप्टेंबरपासून बीड ते अहिल्यानगर (नगर) ही रेल्वेगाडी धा-वणार असल्याची घोषणा खुद्द पालकमंत्री अजित पवार यांनी केली.
१७ सप्टेंबर हा दिवस केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सून, तो मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनही आहे. या दोन्ही ऐतिहासिक संदर्भाचा संगम साधत बीडकरांना ही आगळी भेट देण्याचा निर्धार अजित पवार यांनी व्यक्त केला. बीड जिल्ह्याच्या सार्वजनिक जीवनात ही घटना एक मैलाचा दगड ठरणार आहे.
६ व ७ ऑगस्ट या दोन दिवसांच्या बीड दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तब्बल २१ पेक्षा जास्त कार्यक्रम, आढावा बैठका घेऊन पाहणी कली. या दौऱ्यात त्यांनी अनेक ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून, मंजुरी किंवा निधीअभावी रखडलेले प्रश्न तात्काळ मार्गी लावले. याच दौऱ्यात त्यांनी बीड-नगर रेल्वे प्रकल्पाच्या उर्वरित अडथळ्यांचा आढावा घेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी थेट संपर्क साधत मंजुरी मिळवली. पुढील २० दिवसांत उर्वरित तांत्रिक कामे पूर्ण करून १७ सप्टेंबर रोजी ही रेल्वेगाडी बीड स्थानकातून धावणार आहे.
बीड जिल्ह्यासाठी ही केवळ रेल्वे सुरू होण्याची घटना नाही, तर चार दशकांच्या प्रतीक्षेची समाप्ती आणि जनतेला दिलेल्या वचनपूर्तीचा सुवर्ण क्षण आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या दिवशी ही ऐतिहासिक भेट बीडकरांना देताना मला समाधान वाटते.अजित पवार, उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री