Ambajogai Shop Theft Case | डी वाय एस पी शिंदे यांना चोरट्यांची दुकानं फोडून सलामी

Thieves Break Shops | अंबाजोगाई शहरात चोरट्यांनी एकाच रात्रीत ४ दुकाने फोडली
Ambajogai Theft Case
Shop Thefts(Pudhari File Photo)
Published on
Updated on

Multiple Shop Thefts

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील चोरट्यांनी बुधवार रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शहरातील विविध भागांतील मुख्य रस्त्यावर असलेल्या ४ ठिकाणची दुकाने फोडून हजारो रुपयांचा माल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही सर्व ठिकाणे वर्दळीच्या परिसरात असूनही चोरट्यांनी निर्भीडपणे हात साफ केल्याने पोलीस प्रशासनावर नागरिक प्रश्नचिन्ह निर्माण करत अंबाजोगाई विभागात नुकतेच रुजू झालेले डी वाय एस पी शिंदे यांना चोरट्यानी सलामीच दिल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे.

नगरपरिषदे समोर असलेल्या मुख्य रस्त्यावरील पॅराडाईज वाईन शॉप ,प्रशांत नगर मधील डाॅ तट यांचा दाताचा दवाखाना , बनाळे यांचे किराणा दुकान, तसेच कलावती हॉस्पिटल खाली असलेले मेडिकल स्टोअर अशी ४ दुकाने चोरट्यानी फोडले आहेत. या चोऱ्यांमध्ये नेमका कितीचा ऐवज चोरीला गेला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पॅराडाईज वाईन शॉपमध्ये स्काॅपिीओ गाडीतून आलेल्या ३ चोरट्यांनी चोरी केली असल्याचे प्राथमिक सीसीटीव्ही फुटेज मधून समोर आले आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरीही चोरी झाली होती त्या प्रकरणातील चोर अजूनही पोलीसांच्या हाती लागलेले नाहीत त्यातच आता पुन्हा ४ दुकाने फोडून चोरट्यांनी पोलीस यंत्रणेलाच थेट आव्हन दिल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

Ambajogai Theft Case
Ambajogai Court Verdict | धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीस ९ लाखांचा दंड व ३ महिन्यांची शिक्षा

दरम्यान रात्रीच्या वेळी पोलिसांचे गस्ती पथक कार्यरत असते. गस्तीसाठी पोलीसांची गाडी रात्री फिरते परंतु इतक्या वर्दळीच्या परिसरात सलग ४ ठिकाणी चोरी होत असताना गस्ती पथक काय करत होते असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत या घटनांमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून पोलीसांनी तातडीने ठोस कारवाई करून चोरांचा शोध घ्यावा अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.

Ambajogai Theft Case
Beed News : बीड जिल्हा हरित करणार : जिल्हाधिकारी जॉन्सन

पोलीस निरीक्षक शरद जोगदंड हे मागील काही दिवसांपासून अंबाजोगाई शहरास शिस्त लावण्याचा प्रयत्न करत आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ते वेळोवेळी स्वतः रस्त्यावर फिरत आहेत. मुख्य रस्त्यावर नागरिकांनी केलेले अतिक्रमण काढण्यात देखील पोलीस निरीक्षक जोगदंड हे सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. टवाळखोरांवर देखील त्यांनी जरब बसवला आहे. मात्र एवढे काम करून देखील चोरट्यांनी आपली हातचलाखी दाखवत एकाच रात्रीत चार दुकाने फोडलीच . या घटनेमुळे अंबाजोगाई शहरातील व्यापारी वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करून त्यांनी चोरलेला माल हस्तगत करण्याची मागणी नागरिकांतून केल्या जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news