कडा : आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे हद्दीतील लोणी सय्यद मीर येथे शेतीच्या वादातून झालेल्या भांडणात एकाचा खून झाल्याची घटना शनिवारी घडली. छबु देवकर वय (७२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर मयताचा मुलगा मिठू देवकर गंभीर जखमी झाला आहे.
आष्टी तालुक्यातील सय्यद मीर लोणी येथे देवकर कुटुंबामध्ये गेल्या अनेक दिवसापासून जमिनीचा वाद वाद सुरू आहे त्यातच शनिवारी सायंकाळच्या सुमारास लहान मुले चेंडू खेळण्याच्या वादातून हा वाद पुन्हा उफाळला या वादाचे रूपांतर मारामारीत झाले.
या मारामारी मध्ये छबू देवकर यांना गंभीर मार लागला त्यामुळे त्यांना अहिल्यानगर येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र त्यांना गंभीर मार लागल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान सपोनि मंगेश साळवे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेत तपासाची चक्रे फिरवत दोन टीम तयार करून रामदास देवकर, संतोष देवकर, राहुल देवकर, कविता देवकर,मनीषा देवकर, लता देवकर सर्व रा.लोणी सय्यद मीर ता.आष्टी यांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान लोणी गावांमध्ये तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे.मयत छबू देवकर यांच्यावर लोणी येथे पोलीस बंदोबस्तात अंत्य संस्कार करण्यात येतं आहेत.गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि मंगेश साळवे करत आहेत.