वकिलाने केला महिलेचा विनयभंग Pudhari File Photo
बीड

वकिलाने केला महिलेचा विनयभंग

शहरातील एका वकिलाने मोबाईलवरून फोन करून महिलेशी अश्लील व लज्जास्पद बोलत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Beed Lawyer molested woman

माजलगाव, पुढारी वृत्तसेवा :

शहरातील एका वकिलाने मोबाईलवरून फोन करून महिलेशी अश्लील व लज्जास्पद बोलत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील वकील सुधीर लिंबगावकर याने आपल्या मोबाईल नंबरवरून फिर्यादी महिलेला फोन करून वेळ आहे का तुला? असे विचारले. त्यावर फिर्यादी महिलेने काय काम आहे बोला असे विचारले असता आरोपीने अश्लील स्वरूपाचे बोलणे सुरू केले. त्याने महिलेशी लज्जास्पद व अशोभनीय भाषेत संभाषण केले.

आरोपीच्या या प्रकारामुळे फिर्यादी महिलेला मानसिक त्रास झाला तसेच तिच्या सन्मानाला धक्का बसल्याची भावना निर्माण झाली. या घटनेनंतर संबंधित महिलेने शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होताच शहर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीवरून सुधीर लिंबगावकर या आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कायद्याचे ज्ञान असलेल्या व्यक्तीकडूनच अशा प्रकारची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT