Khasbag Devi Temple pudhari photo
बीड

Beed Navratri Festival 2026 : खासबाग देवी मंदिरात नवरात्र महोत्सवाची तयारी

११ ते २५ ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम; नियोजनाचा आढावा

पुढारी वृत्तसेवा

बीड : बीड शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री तुळजाभवानी श्री खासबाग देवी मंदिरातील शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी विश्वस्त मंडळाची बैठक अध्यक्ष दिनकरराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. ११ ते २५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, महोत्सव यशस्वी करण्यासाठी आवश्यक नियोजनाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. भाविकांनी विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले.

बैठकीस सचिव शरदराव घायाळ, पुजारी मच्छिंद्रबुवा बन महाराज, मंगलताई मोरे, अमोल चौरे, अभयसिंह कदम, झुंजार धांडे, संदीप आदमाने, गणेश गरुड, संदीप माने, अंबादास नवले, संतोष गिरी, कैलास शेजाळ, किशोर गिरी, अजित कदम, संदीप जोशी, बाळासाहेब जगदाळे, श्रीधर करमाळकर, शुभम गिरी व शैलेश गिरी यांच्यासह विश्वस्त उपस्थित होते.

या कालावधीत मंदिरात होणाऱ्या सर्व धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन देवीमातेचे दर्शन व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन दिनकरराव कदम, सचिव शरदराव घायाळ व विश्वस्त मंडळाने केले आहे.

११ ऑक्टोबरला महाअभिषेक व घटस्थापना

११ ऑक्टोबर रोजी सकाळी ६वाजता महाअभिषेक, सकाळी ८ वाजता घटस्थापना, सायंकाळी ७ वाजता छबिना आणि रात्री ८ वाजता आरती होणार आहे. १२ ऑक्टोबरला पहाटे ५.३० वाजता आरती, दुपारी २ ते ५ या वेळेत सामूहिक सप्तशती पाठ आणि रात्री ८ वाजता आरती होईल.

१९ ऑक्टोबर रोजी सकाळी ५.३० वाजता आरतीनंतर सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत प्रतिवार्षिक श्री चण्डीयाग होईल. दुपारी १२.१५ वाजता पूर्णाहुती, सायंकाळी ७ वाजता छबिना आणि रात्री ८ वाजता महाआरती होणार आहे.

२० ऑक्टोबर रोजी विजयादशमीनिमित्त पहाटे ५ वाजता महाअभिषेक आणि सकाळी ६.३० वाजता महाआरती होईल. त्यानंतर सायंकाळी उपवास सोडणे, सिमोल्लंघन तसेच देवीमातेची मंचली श्रमनिद्रा होणार आहे. २५ ऑक्टोबर रोजी अश्विन पौर्णिमेनिमित्त दुपारी १२ वाजता महाअभिषेक होईल. रात्री १२ वाजता छबिना, लक्ष्मी-इंद्रपूजन आरती आणि दूधप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT