Crime News Pudhari Photo
बीड

Beed Crime | केज शहरातील सराईत गुन्हेगारावर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई

एमपीडीए आणि मकोका कायद्यांतर्गत कारवाया सुरू

पुढारी वृत्तसेवा

Kej Police MPDA Action

केज : केज शहरातील सराईत गुन्हेगार जुबेर उर्फ मारी उर्फ पाप्या मुस्ताक फारुकी (वय २९, रा. रोजा मोहल्ला, केज, जि. बीड) याच्याविरुद्ध पोलिस प्रशासनाने महाराष्ट्र प्रतिबंधक धोकादायक कृती कायदा (एमपीडीए) अंतर्गत कारवाई करत त्याची कारागृहात रवानगी केली आहे.

जुबेर फारुकी याच्यावर केज पोलीस ठाण्यात घरात घुसून मारहाण करणे, जबरदस्तीने पैसे उकळणे, चोरी, शस्त्राने हल्ला करणे, दुखापत करणे, दगड-विटांनी मारहाण करणे, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणे, अवैध शस्त्र बाळगणे तसेच मोटारसायकल चोरीसारखे गंभीर स्वरूपाचे एकूण दहा गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी सहा गुन्हे न्यायप्रविष्ट असून चार प्रकरणांचा तपास सुरू आहे.

जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी गुंडगिरी, संघटित गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एमपीडीए आणि मकोका कायद्यांतर्गत कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत.

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या निर्देशानुसार केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी विशेष पथकासह कारवाई केली.

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने, उमेश निकम, हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे, त्रिंबक सोपने, कॉन्स्टेबल शिवाजी कागदे, संतोष गिते, पोलीस नाईक बजरंग मुंडे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल संगिता हनवते यांनी सहभाग घेतला.

पोलिसांनी जुबेर उर्फ मारी उर्फ पाप्या मुस्ताक फारुकी याला ताब्यात घेऊन छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात दाखल केले असून त्याला स्थानबद्ध करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT