Bribe Pudhari File Photo
बीड

Beed Bribe | ‘बाबा, मी गावाकडे यायला निघालोय!’ म्हणताच एसीबीची झडप; लाच घेताना ग्राम महसूल अधिकारी जाळ्यात

जमिनीच्या फेरनोंदीसाठी लाचेची मागणी; केज तहसील कार्यालयामागे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Kaij Revenue Officer Bribe

केज : वडिलोपार्जित जमिनीच्या फेरनोंदीसाठी लाचेची मागणी करून ती स्वीकारणाऱ्या ग्राममहसूल अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. परमेश्वर फलके असे या अधिकाऱ्याचे नाव असून, ८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ७ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. केज तहसील कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या महसूल मंडळ अधिकाऱ्याच्या दालनात हा प्रकार घडला.

केज तालुक्यातील उमरी येथील पुरुषोत्तम यादव यांनी वाटणीपत्राद्वारे त्यांची सर्व्हे क्रमांक १९३ मधील प्रत्येकी २३ आर जमीन मुलगा अक्षय आणि दादासाहेब यांच्या नावे केली होती. तसेच अन्य जमिनीतील प्रत्येकी ११ गुंठे जमिनीबाबत संमतीपत्र देऊन तीही दोन्ही मुलांच्या नावे करण्यास संमती दिली होती. या जमिनींच्या नोंदी महसुली अभिलेखात घेण्यासाठी उमरी सज्जाचे ग्राममहसूल अधिकारी परमेश्वर फलके यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.

या कामासाठी फलके यांनी १० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी ७ हजार रुपये त्यांनी यापूर्वीच दादासाहेब यादव यांच्याकडून स्वीकारल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर उर्वरित रकमेच्या मागणीसाठी त्यांनी तगादा लावल्याचा आरोप आहे. मात्र, लाच देण्याची इच्छा नसलेल्या अक्षय यादव यांनी बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पथकाने ७ ऑक्टोबर रोजी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे अक्षय यादव यांनी फलके यांना ८ हजार रुपये दिले. त्यानंतर पथकाला संकेत देण्यासाठी त्यांनी मोबाईल कानाला लावून, ‘बाबा, मी गावाकडे यायला निघालोय,’ असे मोठ्याने सांगितले. हा ठरलेला संकेत मिळताच दबा धरून बसलेल्या पथकातील अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत फलके यांना ताब्यात घेतले.

भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल

पोलीस निरीक्षक समाधान बळीराम कवडे यांच्या तक्रारीवरून परमेश्वर फलके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT