Woman Molestation Case AI Image
बीड

Kaij Crime | घरात घुसून विवाहितेचा विनयभंग; जाब विचारणाऱ्या सासऱ्यास मारहाण

केज पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Kaij Woman Molestation Case

केज : केज तालुक्यातील एका गावात घरात घुसून १९ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग केल्याचा तसेच या प्रकाराबाबत जाब विचारणाऱ्या तिच्या सासऱ्यास मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा पती २८ मे रोजी कामानिमित्त नांदूरघाट येथे गेला होता. त्या रात्री महिला घरात झोपली होती, तर तिची सासू घराबाहेर झोपली होती. रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास सचिन केशव ठोंबरे याने घरात प्रवेश करून महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

महिलेने आरडाओरडा केल्यानंतर तिची सासू जागी होऊन घरात आली. तिने संबंधितास जाब विचारला असता त्याने तिला ढकलून शिवीगाळ केली आणि तेथून पळ काढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यानंतर रात्री उशिरा पती व सासरे घरी आल्यानंतर महिलेने त्यांना घडलेला प्रकार सांगितला. दुसऱ्या दिवशी सासऱ्याने याबाबत जाब विचारला असता सर्जेराव काशीनाथ ठोंबरे याने त्यांना पकडून ठेवले, तर सचिन केशव ठोंबरे आणि सुमित संतोष ठोंबरे यांनी काठीने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीवरून सचिन केशव ठोंबरे, सुमित संतोष ठोंबरे आणि सर्जेराव काशीनाथ ठोंबरे यांच्याविरुद्ध केज पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस जमादार उमेश आघाव करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT