Crime News pudhari photo
बीड

Beed | विसर्जन मिरवणुकीतून बाजूला नेत तरुणावर चाकूने वार, जुन्या वादातून हल्ल्याचा आरोप

Beed crime| रेहान शेखला उपचारासाठी अहिल्यानगरला हलविले

पुढारी वृत्तसेवा

कडा (जि. बीड) : कडा येथे रात्री गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान जुन्या वादातून एका २२ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मिरवणुकी नंतर रेहान शेख याला बाजूला घेऊन त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात रेहान गंभीर जखमी झाला आहे,प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्याला अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर रात्रीच्या सुमारास रेहान शेख हा मिरवणुकीत सहभागी होता. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात जुन्या वादाच्या कारणावरून काही जणांनी त्याला बाजूला घेतल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे.

या हल्ल्यात रेहानच्या छातीसह दंड आणि पोटाच्या भागावर वार झाल्याचे सांगण्यात आले.गंभीर जखमी अवस्थेत तो घटनास्थळी पडला होता. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ल्याशी संबंधित व्यक्तींचा शोध घेण्याची कार्यवाही पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, हल्ल्याचे नेमके कारण आणि घटनेतील संबंधितांची भूमिका पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे. गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे कडा परिसरात काहीकाळ खळबळ उडाली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमी तरुणाच्या जबाब घेतल्यानंतर सत्यता पडताळून पुढील तपास करण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT