बीड

बीड : पिंपळनेर येथील आशापुरक कारखान्यावर ऊसदरासाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

अविनाश सुतार

पिंपळनेर, पुढारी वृत्तसेवा : बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील आशापूरक अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड या गूळ पावडर तयार करणाऱ्या कारखान्यासमोर ऊसदरासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा बीड जिल्हा कमिटीच्या वतीने आज (दि.९) ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी प्रति टन २,७०० रुपये दर देण्याची मागणी केली. Beed News

यावेळी कारखान्याचे चंद्रसेन पडुळे म्हणाले की, कारखान्यांकडून उसाला २५०० रुपये प्रति टन दर मिळेल. शेतकऱ्यांना ऊस कारखान्याला घालायचा असेल तर घालावा. नाहीतर ऊस देऊ नका, अशी अरेरावीची आणि एकेरी भाषा केली. यावर संतप्त शेतकऱ्यांनी पुढील वर्षापासून कारखान्याला ऊस देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेऊन शेतकरी आंदोलनातून निघून गेले. Beed News

कारखान्याला पिपंळनेर परिसरासह इतर गावांतून कारखान्याला शेतकरी ऊस घालत आहेत. गाळपासाठी चांगला प्रतिसाद मिळत असताना शेतकऱ्यांना मागील वर्षी ३०० रुपये कमी दर दिला आहे. यावर्षी ही उसाला प्रतिटन २५०० रुपये प्रति टन दर दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी २०० रूपये दर वाढवून मागितला. परंतु कारखान्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आंदोलन करण्यात आले, असे महाराष्ट्र राज्य किसन सभा बीड जिल्हा कमिटीचे अध्यक्ष अॅड. अजय गंगाधर बुरांडे यांनी सांगितले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT