Dharur Women Molestation Case
केज : धारूर तालुक्यातील चिंचपूर शिवारात शेतात कापूस वेचणी करत असलेल्या एका विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. १८) घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला व तिची जाऊ शेतात कापूस वेचणी करत असताना अर्जुन महादेव घुगे हा तेथे आला. त्याने वाईट हेतूने पीडित महिलेचा पदर ओढत तिच्याशी झटापट केली व तिचा विनयभंग केला. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे महिला प्रचंड घाबरून गेली.
घटनेनंतर पीडित महिलेने तातडीने युसुफवडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून आरोपी अर्जुन घुगे याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार केशव खाडे करीत आहेत