बीड

Beed crime : अन्न भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या 'व्हे पावडर'चा अवैध साठा जप्त; आष्टी पोलिसांची मोठी कारवाई

Whey powder illegal stock: ​या तपासणी दरम्यान वाहनात व्हे पावडरच्या २५ किलो वजनाच्या ४७ गोण्या आढळून आल्या

पुढारी वृत्तसेवा

आष्टी : दुधात भेसळ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'व्हे पावडर' च्या अवैध वाहतूक आणि पुरवठ्याप्रकरणी आष्टी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ७२ गोण्या व्हे पावडर जप्त करण्यात आली आहे. तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,१८ ऑगस्ट २०२६ रोजी आष्टी- जामगाव रोडवरील नक्षत्र लॉन्ससमोर दुधात भेसळ करण्यासाठी व्हे पावडरची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक आष्टी यांना मिळाली. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक एस. एस.वाघमोडे यांच्या पथकाने सापळा रचून संशयित पिकअप वाहनाची (क्र. MH-13-CU-4141) तपासणी केली.

​या तपासणी दरम्यान वाहनात व्हे पावडरच्या २५ किलो वजनाच्या ४७ गोण्या आढळून आल्या. वाहनचालकाकडे अधिक चौकशी केली असता, त्याने आष्टीतील एका ठिकाणी यापूर्वीच २५ गोण्यांचा पुरवठा केल्याचे कबूल केले.या माहितीवरून पोलिसांनी त्या ठिकाणाहूनही २५ गोण्या जप्त केल्या.​ ७२ गोण्या १ हजार ८०० किलो व्हे पावडर जप्त करण्यात आली आहे, ज्याची अंदाजे किंमत २ लाख ६९, हजार ७०० रुपये आहे.अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.​

ही कारवाई पोलीस अधीक्षक बीड, अपर पोलीस अधीक्षक बीड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आष्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक शरद भुतेकर, सहायक पोलीस निरीक्षक नाना सूर्यवंशी, एस.एस.वाघमोडे, पोलीस हवालदार तागड,जगताप, पोलीस कॉन्स्टेबल वाणी, सजगणे व गुजर यांचा समावेश होता.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. सुशांत लक्ष्मण गोपाळघरे,हरिदास एकनाथ गोपाळघरे (रा. नागोबाचीवाडी ता.जामखेड), कैलास हंबर्डे रा. (आष्टी) यांच्यावर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT