Beed Crime News : रुचकर जेवणासाठी प्रसिद्ध मांजरसुंबा बनतोय अवैध धंद्यांचे हब file photo
बीड

Beed Crime News : रुचकर जेवणासाठी प्रसिद्ध मांजरसुंबा बनतोय अवैध धंद्यांचे हब

जुगार अड्डा, अवैध दारू विक्री, वेश्या व्यवसायामुळे प्रतिमा होतेय मलिन

पुढारी वृत्तसेवा

Beed Crime News: Manjarsumba, famous for its delicious food, is becoming a hub for illegal businesses

नेकनूर, पुढारी वृत्तसेवा : सोलापूर-धुळे महामार्गावर रुचकर व चांगले जेवण मिळणारे ठिकाण म्हणून मांजरसुंबा गत काही दिवसात नावारुपास आलेले आहे. परंतु गत काही काळात या ठिकाणी अवैध धंद्यांमध्ये झालेली वाढ आता प्रतिमा मलीन करणारी ठरू लागली आहे. जुगार अड्डे, अवैध दारू विक्री, चोरट्यांचा वावर, वेश्या व्यवसाय यामुळे आता अनेकजण या ठिकाणी जेवणासाठी न थांबता पुढचा रस्ता धरत आहेत. नुकतीच नेकनूर पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करत 19 जुगारी अटक केले तसेच 72 लाख रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त, केल्याने या ठिकाणचे गैरप्रकार समोर येत आहेत.

अवैध धंदे

मांजरसुंबा येथील एका बिअर बारच्या वरच्या मजल्यावर ऋतुराज सांस्कृतिक व क्रीडा मंडळ कार्यरत आहे. सदर मंडळाला शासनाचा परवाना असला तरी परवान्यातील अटींनुसार तेथे कोणत्याही प्रकारचा जुगार खेळण्यास मनाई आहे. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासणीत या ठिकाणी जुगार खेळला जात असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले.

अनेक दिवसांपासून या ठिकाणी जुगार खेळवला जात असल्याचे समजते पोलिसांच्या कारवाईदरम्यान मंडळाच्या ठिकाणी पत्ते खेळण्यासाठी टेबल-खुर्चाची व्यवस्था, पत्त्यांचे कॅट, विविध रंगांचे टोकन, सभासद ओळखपत्रे आणि उपस्थितीच्या नोंदी आढळून आल्या. याशिवाय उपस्थित व्यक्तींच्या अंगझडतीमध्ये 55 हजार 600 रुपयांची रोख रक्कम आणि मोबाईल फोन मिळून आले. तसेच कारवाईदरम्यान वाहने आणि इतर साहित्य अस एकूण 72 लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणात विलास ज्ञानोबा नाईकवाडे, राम बारीकराव बहिरवाळ, अशोक भालचंद्र वेदपाठक राहुल सुखाहारी गदळे, उत्तरेश्वर किसन खिंडकर शेख अशोक शेख रफीक, सज्जाद खान शफीक खान पठाण, राजेंद्र नारायण जाधव, भरत बलभीमराव काळुंके, संतोष जालींदर चादर, मेघराज योगीराज्ज ढोकणे, महादेव नारायण शिंदे, कानिफनाथ गणेश हुंबे, शेख समी शेख नईम, संदीप पिलाजी गोरे निजामोद्दीन बक्षुद्दीन शेख, शकीलभाई युनूसभाड वोहरा, विष्णू अर्जुन निमुडे आणि संदीप छत्रभुज खोने अशा एकूण 19 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

पांढरेंनी काळे धंदे उघडकीस आणले

पोलीस अधीक्षक बीड नवनीत कावंत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. विशेषतः मांजरसुंबा हे ठिकाण नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते, ठिकाणच्या अधिकाऱ्यांना या अवैध धंद्यांबाबत माहिती नव्हती का? किती दिवसांपासून हा जुगार अड्डा चालत होता? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. भारत पांढरे यांनी या ठिकाणी चालत असलेले इतर गैरप्रकार देखील समोर आणण्याची मागणी आता केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT