Beed Molestation Case 
बीड

Beed Crime News: केज तालुक्यात शेतात काम करणाऱ्या ३५ वर्षीय महिलेचा विनयभंग

या प्रकरणी एकाविरुद्ध केज पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पुढारी वृत्तसेवा

गौतम बचुटे

केज : केज तालुक्यात शेतात काम करीत असलेल्या एका ३५ वर्षीय महिलेस नराधमाने अचानक पाठीमागून येऊन मिठी मारून विनयभंग केला. या प्रकरणी एकाविरुद्ध केज पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज तालुक्यातील एका गावात १४ ऑगस्ट रोजी दुपारी १:०० वाजेच्या दरम्यान ३५ वर्षीय विवाहित महिला ही शेतात काम करीत असताना ती एकटीच असल्याची संधी साधून दगडू तुळशीराम केदार (रा. गप्पेवाडी ता. केज) याने अचानक पाठीमागून येऊन मिठी मारली. त्याने पीडित महिलेच्या हाताला वाईट हेतूने धरून खाली पाडून विनयभंग केला.

पीडित महिलेने विरोध करताच त्याने तिला शिवीगाळ करून चापट बुक्यांनी मारहाण केली. तसेच तिच्या गळ्यावर नखाने ओरखडे ओढून हाताच्या बोटांना चावा घेतला आणि तुला जिवंत सोडणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित महिलेच्या तक्रारी वरून दगडू केदार विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार उमेश आघाव तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT