theft Pudhari
बीड

Beed Theft News : घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

या प्रकरणी युसुफवडगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पुढारी वृत्तसेवा

गौतम बचुटे

केज : मुलांना भेटण्यासाठी पुण्याला गेलेल्या कुटुंबाच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि २५ हजार रुपये रोख असा तब्बल १ लाख ५३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना केज तालुक्यातील नायगाव येथे घडली असून, युसुफवडगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नायगाव येथील सुदर्शन फकिरा खोडसे आणि त्यांचे भाऊ समाधान खोडसे हे व्यवसायानिमित्त कुटुंबासह पुणे जिल्ह्यातील मांजरी (खु.), ता. हवेली येथे वास्तव्यास आहेत. तर त्यांचे आई-वडील नायगाव येथे राहतात. १५ ऑगस्ट रोजी आई-वडील मुलांना भेटण्यासाठी पुण्याला गेले होते. घराला कुलूप असल्याची संधी साधत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी सामान अस्ताव्यस्त करत कपाटाची झडती घेतली. कपाटातील सुमारे ४० हजार रुपये किमतीचे एक तोळ्याचे गंठण, २० हजार रुपयांच्या पाच ग्रॅम सोन्याच्या कानातील रिंगा, २८ हजार रुपयांच्या सात ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या अंगठ्या, एक नथ, चार सोन्याचे मणी तसेच सुमारे ४० हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि २५ हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ५३ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

या प्रकरणी सुदर्शन खोडसे यांनी १८ ऑगस्ट रोजी युसुफवडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अरुण मोरे पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT