

गौतम बचुटे : केज तालुक्यातील साळेगाव येथे मोटार सायकल चोरीच्या उद्देशाने आलेले चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून, त्यांच्यासोबत एक कार देखील होती. मात्र दुकानाच्याबाहेर झालेल्या दुकान मालकाला चोरांची चाहूल लागल्याने मोटार सायकल चोरीचा बेत फसला आहे.
केज तालुक्यातील साळेगाव येथे ४ मे रोजी रात्री जयमल्हार कृषी केंद्राचे खंडू घाटुळे हे त्यांच्या कृषी केंद्राचे समोर त्यांची मोटार सायकल लॉक करून झोपले होते. ५ मे रोजी मध्यरात्री ३:४४ वा. च्या सुमारास साळेगाव येथील बाजार तळाच्या रस्त्याने केज-कळंब जाणाऱ्या महामार्गाकडे एक कार येत होती. त्या कारच्या पुढे एक संशयित चोर तरुण पायी चालत येत होता. कार चालक त्या तरुणाच्या मागे मागे मंद गतीने कार चालवित होता.
संशयित चोरट्याने जय मल्हार कृषी सेवा केंद्राजवळ आल्यानंतर त्यांच्याकडील बनावट चावीने खंडू घाटुळे यांच्या मोटार सायकलचे लॉक उघडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा आवाज येताच कृषी केंद्राच्या बाहेर मोटार सायकल जवळ झोपलेले खंडू घाटुळे हा युवक जागा झाला. त्यामुळे चोर सुद्धा सतर्क झाले. चोरट्यांना खंडू घाटुळे यांनी काय करतोस असा जाब विचारताच माळेगाव कडे जाणारा रस्ता कोणता आहे? असे म्हणून सारवासारव करीत कारमधून निघून गेले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून घाटुळे यांनी ही माहिती पोलिसांना देखील दिली असल्याचे समजते.
ऐ बाबू टाईम क्या हुआ स्टाईलने चोरीचा प्रयत्न
अज्ञात चोरटा जेव्हा बनावट चावीने मोटार सायकल चोरण्याचा प्रयत्न करीत होता तेव्हा आवाजाने जागी झालेल्या खंडू घाटुळे यांनी ए काय करतोस ? असे विचारताच चोरटा त्यांना म्हणाला "मालेगाव को कौनासा रस्ता जाता है ?" असे म्हणून चोरटे निघून गेले.